SULABH MARATHI VYAKARAN VA SHABDSANGRAH
लेखक : प्रमोद राजपूत
प्रथम आवृत्तीच्या निमित्ताने
‘मराठी’ माझी मातृभाषा ‘बोलण्यास प्रेमळ, ऐकण्यास मधुर व लिहून पाहिल्यास अतिशय सुंदर व सोपी आहे तसेच महाराष्ट्रात प्रांतनिहाय बोलण्याची शैलीच निराळी आहे. मराठी माणसाला मराठी बोलण्यास सोपी तर अभ्यासासाठी थोडी अवघड, अशा विविध रंगरुपांनी नटलेल्या भाषेच्या व्याकरणावर पुस्तक लिहणे एक आव्हानच होते. जून २०१२ पासून नंदुरबार जिल्हा या ग्रामिण भागापासून ते पुणे या महानगरातील विद्यार्थ्यांना ‘मराठी व्याकरण’ हा विषय शिकविण्याचा अनुभवामुळे या विषयाच्या अभ्यासाचे विविध पैलू व सखोलता लक्षात आली हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या यशाच्या कार्यात सहभागी होता आले. हा विषय सुलभ बनविण्यासाठी मोरो केशव दामले, दादोबा पांडुरंग तर्खडकर, श्री. चिपळूणकर, कृ. य. गोडबोले यांसारख्या व्याकरणकारांचे ग्रंथ अभ्यासण्याचे भाग्य प्राप्त झाले. सध्याच्या परीक्षा पद्धतीत या ग्रंथांवर आधारित बरेच प्रश्न विचारले जात आहेत तसेच काळानुसार वर्णमालेत व लिखानाच्या पद्धतीत काही बदल करण्यात आले आहेत (मराठी भाषा शासन निर्णय २००९) म्हणून या सर्व बाबी लक्षात घेवून आवश्यक ते सर्व घटक व संकल्पनांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.
या लेखन कार्यात माझ्या यशोदीप अकॅडमीतील स्टाफ, मित्र व माझ्या परिवाराचे अनमोल सहकार्य मिळाले. सुलभ मराठी व्याकरण व शब्दसंग्रह आपल्या यशात महत्वाची भुमिका बजावेल याची मला खात्री आहे. या कार्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सहकार्य केले याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आपल्या यशासाठी मन: पुर्वक शुभेच्छा !
प्रमोद राजपूत
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.