लेखक :नितीन महाले
मिलिग महाने सरांचे मनोगत
विद्यार्थी मित्रांनो,
आपण माझ्या ‘Magic of Mathematics’ या गणिताच्या पुस्तकास व ‘मानाचा मुजरा मराठी व्याकरणाला या मराठीच्या पुस्तकास खुप डोक्यावर घेतले व मला आणि कोकिळा प्रकाशनास नावास्याला आणले, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद मात्र काही पुस्तक विक्रेत्यांनी माझ्या या दोन्ही पुस्तकांच्या पायरेटेड ड्युप्लीकेट कॉपीज़ बाजारात आणून माझी व तुमच्या सारख्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांची फसवणूक केली. त्यामुळे मी मधल्या काळात बुध्दीमत्ता चाचणी हे पुस्तक प्रकाशित करू शकलो नाही. मात्र आता अशा फसव्या दुकानदारांवर नजर ठेवण्यासाठी व माझ्या पुस्तकातून Matter चोरणा-या चोरट्या लेखकांवर नजर ठेवण्यासाठी Patrons या संस्थेची कायदेशीर नेमणूक केली आहे. जेणेकरून या फसव्या लोकांविरुद्ध कॉपीराइट कायदयासह कारवाई करता येईल. अशीच एक कारवाई आम्ही नागपूर शहरातील एका होलसेल पुस्तक विक्रेत्यावर केली आहे. यामुळे आता बुध्दीमत्ता चाचणी हे पुस्तक विद्यार्थ्यासाठी बिनदिक्कत प्रकाशित करीत आहोत.
सदरचे पुस्तक मी सर्व धडपडणा-या तरुण वर्गाला समर्पित करीत आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे कि बुध्दीमत्ता चाचणी या विषयासाठी माझे पुस्तक मुलांना खुप मदत करणारे ठरेल. या पुस्तकात जास्तीत जास्त संकल्पना समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला आहे व विद्यार्थ्यांनी माझे
हे पुस्तक अतिशय काळजीपूर्वक वाचावे असे मला वाटते. या पुस्तकानिमित्त मी माझी आई कोकिळा शांताराम पाटील व माझे वडिल शांताराम विरभान पाटील यांचे खूप आभार मानतो.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.