MJ Shaikhs Spardha Pariksha Atyavashyak Engreji Vyakaran
लेखक : एम जे शेख / M J Shaikhs
विद्यार्थी मित्रांनो,
स्पर्धा परीक्षा अत्यावश्यक पुस्तक तुमच्या हाती देत असताना अतिशय आनंद होत आहे. स्पर्धा परीक्षांसाठी इंग्रजीचे महत्व जाणून सोप्यात सोप्या भाषेत इंगजी का विषय या पुस्तकात लिहिण्याना प्रयत्न केला आहे.
काही विद्यार्थी इंग्रजी भाषेला अगदी सुरुवातीपासून वरून आपल्या उच्च शिक्षणाकडे मार्गक्रमण वीत असतात, त्यामुळे आपण दिवसेंदिवस या भाषेचा दुरावा व आपले या भाषेविषयीचे ज्ञान अधिकच वाढवित असतो. प्रत्यक्षात वा आषेधा व्यावहारिक उपयोग न महाविद्यालयीन शिक्षणानंतरही तिथी निकड मात्र अधिकच जाणवते. अशा समाज्य विद्यार्थी वर्ग या भाषेच्या अज्ञानामुळे गुणवत्ता असूनही या स्पर्धेच्या युगात मागेच पडताना दिसतो. विद्याथ्र्यांची ताली विषयाची भीती दूर करून इंग्रजी अवगत करण्यासाठी साहाय्य करणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे.
“स्पर्धा परीक्षा अत्यावश्यक इंग्रजी’ या पुस्तकाबद्दल बोलायचे झाले तर मी गेल्या 17-18 वर्षांपासून इंग्रजी विषया अनेक नामांकीत संस्थांमध्ये अध्यापन करीत आलेलो आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्याथ्र्यांच्या प्रत्यक्ष अडचणी काद असतात हे मला जेथे जेथे मी शिबीर घेतले तेथे जाणवल्या. विशेषतः PSI/STI/ASO तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेमधील इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रहाविषयी मुलांच्या ज्या अडचणी असतात, त्या सोडविण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे करण्यात आला आहे.
या पुस्तकात विशेषतः राज्यसेवा, (MPSC) PSI/STI/ASO व इतर तत्सम परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार घटकनिहाय व त्या घटकाअंतर्गत योग्य अशी प्रश्नोत्तरे व आयोगाने त्या-त्या घटकांवर विचारलेले प्रश्न देण्यात आलेले आहेत. जेणेकरून, विद्याथ्र्यांच्या येणाऱ्या अडचणींवर हे पुस्तक एक रामबाण उपाय ठरणार आहे. हे पुस्तक वाचताना मुलांना जवळ शब्दकोश घेऊन बसण्याची गरज नाही कारण प्रत्येक शब्द हा मराठी भाषेत देण्यात आलेला आहे.
M. J. Shaikh’s ‘स्पर्धा परीक्षा अत्यावश्यक इंग्रजी व्याकरण’ या पुस्तकाचा उपयोग राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी, शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी होईल तसेच प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळ, रेल्वे बोर्ड, बँक रिक्रुटमेंट बोर्ड इ. सर्व स्तरांवर घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी हे पुस्तक एक जनदान ठरणार आहे. हे पुस्तक पूर्ण करताना मला अनेकांचे सहकार्य लाभले आहे. त्यांचा जर भी उल्लेख केला नाही तर ते कृतघ्नपणाचे ठरेल. हे पुस्तक लिहिण्यासाठी गळा प्रेरित करणारे माझे मित्र कपिल पवार (MAFS) व पुस्तक अद्ययावत व अधिकाधिक परीक्षाभिमुख
करण्यासाठी अनमोल मार्गदर्शन करणारे भगीरथ अॅकॅडमीचे संचालक प्रा.रंजन कोळंबे सर यांचा मी खूप आभारी आहे. ‘स्पर्धा परीक्षा अत्यावश्यक इंग्रजी’ हे पुस्तक अतिशय काटेकोरपणे म्हणजे विजक लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. जजरचुकीने काही त्रुटी किंवा उणिवा राहिल्या असल्यास यासंदर्भात वाचकांच्या सूचनांचे स्वागत करण्यात येईल.
Prof. M. J. Shaikh
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.