Spardha Pariksha Shabda Samarthya स्पर्धा परीक्षा शब्द सामर्थ्य
लेखक : लीलाधर पाटील
मनोगत व आभार स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बंधू भगिनींना सस्नेह
नमस्कार,
सर्वप्रथम आपण माझ्या स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण या पुस्तकाला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! मराठी विषयाचा अभ्यास करीत असताना व्याकरणासोबतच शब्दसंग्रहाचे भांडार संपन्न असणे गरजेचे असते. व्याकरणातील नियमांसोबत म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, इ.चे ज्ञान विद्यार्थ्याला असल्यास मराठी विषयात गुण मिळविणे सोपे होते.
आपली मराठी भाषा शब्दांच्या ऐश्वर्याने संपन्न आहे. महाराष्ट्रातील विविध संस्कृती, समाजातील नाना तऱ्हा यामुळे शब्द उपलब्धी अमाप आहे. या सर्व शब्दांचा एकत्र संग्रह विद्यार्थ्यांच्या हातात असावा यासाठी ‘शब्दसामर्थ्य’ ही पुस्तकनिर्मिती केली आहे. यात अधिकाधिक संदर्भ घेवून संकलन केले आहे. याद्वारे पुनःश्च एकदा आपली सेवा करण्याचा आनंद लाभत आहे.
या निर्मितीमागे खरे श्रेय गुरूवर्य यजुवेंद्र महाजन सरांना जाते. त्यासह ‘दीपस्तंभ प्रकाशना’चे जगदिश महाजन व सहकारी दीपक पाटील, ‘दीपस्तंभ’ चे सर्व सहकारी या सर्वांचे विशेष आभार आपल्या सूचना स्वागतार्ह असतील. धन्यवाद!
आपला मित्र
लीलाधर पाटील (PSI)
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.