VidyaBharati Sampurn Compulsory English ( संपूर्ण इंग्रजी व्याकरण )
लेखक • डॉ. एस. आर. अवस्थी
मनोगत
‘Compulsory English for MPSC and All Competitive Examinations t पुस्तक सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा – विशेषत: MPSC- देऊ इच्छिणाऱ्या महत्वाकांक्षी, अभ्यासू, आणि यशाच्या विविध क्षेत्रांना गवसणी घालण्याची उमेद व हिंमत असणाऱ्या विद्याथ्यांच्या हाती देतांना खूप आनंद होत आहे. यशाला आपल्या कवेत घेण्यासाठी आसुसलेल्या विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्याचे, ऊर्जा देण्याचे काम हे पुस्तक निश्चितच करेल, असा विश्वास आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यादृष्टीने विद्यार्थी प्रयत्नही करत आहेत. कष्ट उपसण्याची त्यांची तयारी आहे. गरज आहे ती योग्य दिशेने अभ्यास करण्याची आणि योग्य मार्गदर्शनाची योग्य दिशादर्शन व मार्गदर्शन करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल, ही खात्री आहे.
स्पर्धा परीक्षेतील इंग्रजी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि बहुतांश विद्याथ्र्यांना इंग्रजी विषयाचा अभ्यास कसा करावा, ही डोकेदुखी वाटते. ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा या परीक्षांना सामोरा जाऊ इच्छितोय… सामोरा जातोय आणि काही प्रमाणात यशस्वी पण होतोय. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या परीक्षेत यशस्वी व्हावे तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचा अभ्यास सोप्या पध्दतीने करता यावा, या दृष्टीने पुस्तकाची मांडणी केलेली आहे.
स्पर्धा परीक्षेमधील इंग्रजी विषयाची काठीण्यपातळी ही पदवी पर्यंतची असते. विद्याथ्र्यांची खरी अडचण एकच आहे; विद्यार्थ्यांनी वर्षांनुवर्षापासून एक गैरसमज गोंजारत ठेवला आहे. आणि तो म्हणजे- इंग्रजी म्हणजे Grammar आणि Grammar म्हणजे इंग्रजी. लक्षात ठेवा, Grammar हा कोणताही भाषाविषयाचा एक भाग असतो. Grammar म्हणजे संपूर्ण भाषा नाही. तुम्हाला इंग्रजी भाषेचा अभ्यास करायचा आहे. इंग्रजी भाषेची परीक्षा द्यायची आहे. फक्त इंग्रजी व्याकरणाची नाही. त्यासाठी तुम्हाला ‘शब्दसाठा वाढविणे गरजेचे आहे. शब्दसाठा म्हणजेच ‘Vocabulary’. याचे महत्त्व Comprehen _sion Section यशस्वीपणे सोडविण्यासाठी वादातीत आहे. अनेक वर्षापासून अध्यापन क्षेत्रात इंग्रजी शिकवत असल्यामुळे एक खेदजनक बाब लक्षात आली आहे आणि ती म्हणजे शालेय पातळीपासूनच विद्यार्थी व शिक्षक ‘Vocabulary’ किंवा शब्दसंग्रह समृद्ध करण्यासाठी अनुत्सुक असतात, त्यावर भर देतांना आढळत नाही. विद्याथ्र्यांची ही समस्या लक्षात घेवून या पुस्तकात Vocabulary Section आणि Section वर Grammar सोबतच अधिक भर देण्यात आलेला आहे.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.