Sankhyatmak Abhiyogyata (Ankaganit) Quantitative Aptitude -Sachin Dhawale’s
लेखक : सचिन राजाराम ढवळे
संचालक : Sachin Dhawale’s Maths & Reasoning Academy, Pune
मनोगत
सचिन ढवळेज् पब्लिकेशन्सच्या बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमता परीक्षण, कॉम्प्रेहेन्सिव्ह MPSC CSAT 21 सराव प्रश्नसंच, संख्यात्मक अभियोग्यता आणि तर्कक्षमता सराव प्रश्नसंच तसेच कॉम्प्रेहेन्सिव्ह MPSC गट-ब आणि गट-क सराव प्रश्नसंच या पुस्तकांना विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. म्हणूनच आम्ही विद्यार्थ्यांच्या मागणीचा आदर करत वा पुस्तकाच्या लेखन प्रपंचास सुरूवात केली आणि ते आज पूर्णत्वास आले.
ज्यांच्याशिवाय या पुस्तकाची कल्पनाच करणे अवघड ठरेल ते म्हणजे माझे सहलेखक श्री. कोमल दसरे सर यांनी मला है। पुस्तक तयार करण्यास सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोलाचे सहकार्य केले आहे. त्याबद्दल मी त्यांचा खुप खुप आभारी आहे. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी माझ्या बुध्दिमत्ता चाचणी व गणित शिकवणीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याचेच फलित जणू मी मागील 3 वर्षात 50+ बॅचेस यशस्वीरित्या पार पाडल्या. या बॅचेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी माझ्या हाताखालून पडले आहेत. पण प्रत्येकच विद्यार्थी क्लास लावू शकतो असे नाही. पण जे विद्यार्थी माझे Youtube वरील
बुध्दिमत्ता चाचणी व गणिताचे Video पाहतात पण ते पुण्यात येवू शकत नाहीत किंवा काही विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत
किंवा क्लास लावलेल्या विद्यार्थ्यांनाही एखादा संदर्भग्रंथ आवश्यक होता तसेच राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार पुस्तकांची मराठीत
सोप्या भाषेत आवृत्ती नसल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी मला मागील 2 ते 3 वर्षापासून अशा संदर्भांवाची मागणी करत होते.
त्यांच्या मागणीला प्रतिसाद देवून हे पुस्तक लिहायला घेतले.
विद्यार्थी मित्रांनो वा पुस्तकात संख्यात्मक अभियोग्यता (गणित) या विषयावर आजपर्यंत UPSC व MPSC च्या परीक्षांमध्ये विचारले गेलेले जवळ जवळ सर्वच प्रश्न स्पष्टीकरणासह दिले आहेत. पुस्तकाची रचना मात्र प्रत्येक पटकात सर्वात अगोदर Basic to Advance अशी उदाहरणे देवून पटक समजावून दिला आहे. त्यानंतर त्या घटकावर जेवढे काही Type (I, II, III, IV…) तयार होतात त्वा सर्वच Type चे काही उदाहरणे व त्यांचे स्पष्टीकरणही दिले आहेत. त्यानंतर त्यावर भरपूर सराव प्रश्न स्पष्टीकरणासह दिले आहेत व सरतेशेवटी त्या पटकावर आजपर्यंत आयोगाच्या परीक्षांमध्ये आलेले जवळ जवळ सर्वच प्रश्न व त्यांची स्पष्टीकरणे दिली आहेत. अशीच रचना मित्रांनो आम्ही प्रत्येक घटकात केली आहे.
मित्रांनो MPSC CSAT चा पेपर असो किंवा गट-ब व गट-क Pre/Mains चा पेपर असो संख्यात्मक अभियोग्यता (गणित) हा विषय Game Changing Factor ठरला आहे. म्हणून या विषयाकडे योग्य त्या वेळी लक्ष दिल्यास हा विषय सर्वाधिक न्याय देणारा ठरू शकतो हे मी
तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. हे पुस्तक मी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी बंधू-भगिनींना समर्पित करत आहे.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.