TCS IBPS Pattern Vanrakshak Bharti 30 Prashnapatrika
मनोगत ,मित्रांनो,
महाराष्ट्र वन विभागामार्फत वनरक्षक पदभरतीसंबंधी कार्यवाही सुरू असून लवकरच जाहिरात येईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे प्रचंड स्पर्धेत आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करणे आवश्यक आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती,
प्रश्नांचे स्वरूप लक्षात येण्यासाठी आणि अभ्यासाला योग्य
दिशा देण्यासाठी पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे
अनिवार्य आहे. हे लक्षात घेऊनच, वनरक्षक ३० प्रश्नपत्रिका
यासंदर्भात- पहिल्या विभागात सन २०१९ मधील २३ ऑनलाइन प्रश्नपत्रिका संस्करित स्वरूपात दिलेल्या आहेत. • कालबाह्य प्रश्नांत आगामी परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील
असे बदल केले आहेत.
“आगामी परीक्षेचा विचार करून चालू
घडामोडीवरील
प्रश्नांचे अद्ययावत संदर्भ देखील दिलेले आहेत. दुसऱ्या विभागात ‘TCS पॅटर्न’ वर आधारित ७ सराव प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. यामध्ये काही निवडक प्रश्नांची स्पष्टीकरणेही दिलेली आहेत.
सुरुवातीला वनविषयक जनरल नॉलेज रंगीत स्वरूपात दिलेले आहे. यामध्ये हमखास प्रश्न विचारले जातील असे घटक व्याघ्रप्रकल्प, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, जागतिक वारसा स्थळे, वनविषयक संस्था इत्यादी… यांच्या याद्या दिल्या आहेत.
अखेरीस चालू घडामोडींचा विशेष परामर्श घेतला आहे. या सर्व बाबींमुळे या संदर्भाची उपयुक्तता वाढण्यास मदतच झालेली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, या पुस्तकावर आधारित व्हिडिओ सिरीजदेखील आपणास Vinayak Ghayal Study या यु-ट्युब चॅनेलवर पाहता येऊ शकेल. तेथे आपल्याला मराठी, इंग्रजी, गणित व बुद्धीमापन या घटकांवरील प्रश्नांची स्पष्टीकरणेही अभ्यासता येतील.
आगामी वनरक्षक भरतीसाठी हे पुस्तक आपणास उपयुक्त ठरावे या सदिच्छेसह…. परीक्षेतील मनाजोगत्या यशासाठी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!!
आपला : विनायक घायाळ
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.