Vanrakshak Bharti TCS IBPS Pattern Ghataknihay 1200+Vastunisth Prashn Uttaransah
के’सागरीय…
महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामार्फत मोठ्या प्रमाणावर वनरक्षक पदांची भरती होणे नियोजित आहे. वनरक्षक पदांसाठी प्रथमच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. वनरक्षक लेखी परीक्षेत पर्यावरणविषयक सामान्यज्ञान, बौद्धिक चाचणी, मराठी व इंग्रजी हे विषय समाविष्ट असून १२० गुणांची वस्तुनिष्ठ परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे.
आपल्या परीक्षेकरिता विहित करण्यात आलेल्या सामान्यज्ञान घटकात वने, महाराष्ट्र वन विभाग, वनरक्षक कर्तव्ये, वन्यजीव, जैवविविधता, हवामान, पर्यावरण, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल व भारतीय राज्यघटना या उपघटकांचा समावेश आहे.
सामान्यज्ञान घटकाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविण्याचा अल्पावधीत सराव होण्यासाठी व वेळ नियोजनात अचूकता येण्यासाठी डॉ. शशिकांत व स्वाती अन्नदाते आणि प्रा. अंकुश बनसोडे व सारिका बनसोडे यांनी प्रस्तुतचे ‘बने, पर्यावरण, जैवविविधता व वन्यजीव घटकनिहाय १२०० + वस्तुनिष्ठ प्रश्न; हे पुस्तक साकारले आहे.
वनरक्षक परीक्षेसाठी सामान्यज्ञान घटकाची तयारी करण्यासाठी प्रस्तुतचा संदर्भ विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त ठरणार असून त्यातून १२०० + वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी चांगल्या प्रकारे होईल. महत्त्वाचे म्हणजे प्रकाशनाने यापूर्वी प्रकाशित केलेले अस्मादिकांचे ‘संपूर्ण वनरक्षक’ व डॉ. अन्नदाते व प्रा. बनसोडे यांचे ‘वनरक्षक १५ सराव प्रश्नपत्रिका’ हे संदर्भही विद्याथ्र्यांना संपूर्ण तयारीसाठी व यशस्वी होण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
विद्यार्थ्यांना आगामी वनरक्षक परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
आपला, व्ही. एस. क्षीरसागर (K’Sagar)
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065
Reviews
There are no reviews yet.