TCS IBPS Pattern Sampurna Vanrakshak Bharti / Van Vibhag Bharti 2023 संपूर्ण वनरक्षक के सागर
Sampurna Vanrakshak Bharti / Van Vibhag Bharti 2023 TCS IBPS Pattern संपूर्ण वनरक्षक के सागर
K’ सागरीय…
नजीकच्या काळात राज्यातील वनरक्षकांची पदे सरळसेवेने भरावयाची प्रक्रिया सुरू
होणे अपेक्षित आहे. या परीक्षेकरिता वनविभागाने अतिशय तर्कसुसंगत अभ्यासक्रम विहित केला आहे. हा अभ्यासक्रम पाहता आता उमेदवाराच्या बौद्धिक क्षमतेबरोबरच भरावयाचे पद लक्षात घेऊन त्या पदासाठी कोणते ज्ञान आवश्यक आहे व उमेदवाराचा मानसिक कल कसा असणे आवश्यक आहे, याचीही चाचणी या परीक्षेच्या माध्यमातून घेतली जात असल्याचे दिसून येते. वनविभागाचा हा परिवर्तनदृष्टिकोन दृष्टिकोन आणि अली-
कडील बदललेली प्रश्नपद्धती यांचा एकत्रित व साकल्याने विचार करून प्रस्तुतच्या
वनरक्षक’ या संदर्भाची रचना साकारली आहे..
या परीक्षेसाठी वनविभागाने सामान्यज्ञान, महाराष्ट्र राज्याचा भूगोल व इतिहास, बन, पर्यावरण, हवामान, जैवविविधता, वन्यजीव, पर्यावरण संतुलन, बौद्धिक चाचणी, मराठी व इंग्रजी असा अभ्यासक्रम विहित केला आहे. दोन ओळीत नमूद केलेल्या या अभ्यासविषयाची व्याप्ती प्रचंड असून कक्षा निश्चितच अतिशय विस्तृत आहेत. या पार्श्वभूमीवर अस्मादिकांनी आयोगाच्या स्पर्धात्मक परीक्षांच्या विश्वातील आपल्या लेखनानुभवाधारे संबंधित विषयांची संभाव्य व्याप्ती व कक्षा लक्षात घेऊन अभ्यासविषयास न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
प्रस्तुतच्या संदर्भाची रचना साकारताना सामान्यज्ञान विभागांतर्गत- (१) महाराष्ट्राचा भूगोल व महाराष्ट्रविषयक सामान्यज्ञान; (२) भारताचा भूगोल व भारतविषयक सामान्यज्ञान; (३) भारतातील वने; (४) महाराष्ट्रातील वने (५) पर्यावरण व प्रदूषण, हवामान बदल, जैवविविधता व वन्यजीव (६) महाराष्ट्राचा इतिहास अशी सहा प्रकरणे दिली असून सामान्यज्ञान, मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी व चालू घडामोडी अशा एकूण पाच विभागांतर्गत पुस्तकाची रचना साकारली आहे. ‘भारतातील वने व महाराष्ट्रातील वने’ या दोन स्वतंत्र व विशेष प्रकरणांचा समावेश या पुस्तकात बुद्ध्या केला आहे. सामान्यज्ञानाच्या व चालू घडामोडींच्या अनुषंगाने आपल्या परीक्षेत भारतातील व महाराष्ट्रातील वनांच्या संदर्भात प्रश्न विचारले जाणे अपेक्षित अन् खरेतर, अनिवार्यच आहे; हे लक्षात घेऊनच अद्ययावत आकडेवारी अंतर्भूत असलेल्या या विशेष प्रकरणांची रचना साकारली आहे.
एवम्, उमेदवाराचे यश हेच लक्ष्य ठेवून प्रस्तुतचा संदर्भ आकारास आला आहे. साधीसोपी भाषाशैली, दर्जा, गुणवत्ता व उपयुक्तता ही के सागरीय वैशिष्ट्येही जाणिवपूर्वक जपली आहेत.
आपलाच,व्ही. एस. क्षीरसागर (K’Sagar)
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.