SHIKSHAK ABHIYOGYATA VA BUDDHIMATTA CHACHANI ( TAIT )
₹560.00 Original price was: ₹560.00.₹392.00Current price is: ₹392.00.
Author : Krushna Rokade , Reshma surulkar , AjitKumar
Edition : 2nd-2023
Language : Marathi
Publisher : Bee Publication
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
SHIKSHAK ABHIYOGYATA VA BUDDHIMATTA CHACHANI ( TAIT )
-: मनोगत :-
नमस्कार
सर्वप्रथम शिक्षक होण्याच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सर्वच भावी शिक्षक मित्र-मैत्रिणीना शत नमन करतो. प्रिय शिक्षक मित्रहो,
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर I व II, 2013 से 2018 प्रश्नपत्रिका विश्लेषण व वर्गीकरण” या आपल्या पुस्तकाम आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादानंतर “शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी प्रालपत्रिकांचे विषय व घटकनिहाय वर्गीकरण हे पुस्तक आपल्या हाती देत असताना अत्यानंद होत आहे.
आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते व हे शिक्षण देशाचे आधारस्तंभ असलेल्या बालकांमध्ये रुजविण्याचे महान कार्य शिक्षकांना करावे लागते. परंतु बदललेल्या शैक्षणिक धोरणानुसार 21 व्या शतकातील शिक्षक हा सर्वगुण संपन्न, समाजशील, कृतीशील असणे अत्यंत गरजेचे आहे. ही जाणीव शासनस्तरावरती ठेवून बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमन 2009 नुसार महाराष्ट्र सरकारने 2013 सालापासून महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घेण्यास सुरुवात केली, आणि यामुळे इ. 1 ली ते इ. 8 वी पर्यंतच्या शिक्षक होवू पाहणान्या बाधवांच्या वाटेत एक अडथळा निर्माण झालो. तसेच 2017 च्या शासननिर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये इ. 1 ली ते इ. 12 वी पर्यंतच्या शिक्षण सेवक भरतीसाठी ‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा बंधनकारक करण्यात आली. त्यामुळे शिक्षक होण्याच्या आपल्या स्वप्नांमध्ये अडथळा निर्माण झाला. परंतु हा अडथळा दूर व्हावा व आपली स्वप्नपूर्ती व्हावी या आशेने सुरवातीस परीक्षा पद्धतीचे स्वरूप देवून मी व माझ्या सहकान्यांनी आपल्यासाठी मागील TAIT परीक्षेच्या सर्वच प्रश्नपत्रिकांचे विषय व घटकनिहाय वर्गीकरण करण्याचे हाती घेतलेले कार्य खऱ्या अर्थाने आज पूर्णत्वास आले.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी प्रश्नपत्रिका वर्गीकरण हे पुस्तक आपल्या हाती देत असताना अत्यानंद होत आहे. कारण ज्या लहान बालकांकडे या देशाचे आधारस्तंभ म्हणून पाहिले जाते ते आधारस्तंभ मजबूत करण्याचे महान व्रत आपण सर्वांनी आपल्या हाती घेतले आहे व हे हात बळकट करण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे.
सदर पुस्तक पूर्णत्वास नेण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मला प्रोत्साहित केले अशा सर्वांचा मी ऋणी राहील. तसेच पुस्तक दर्जेदार होण्यासाठी प्रा. रेश्मा सुरुलकर, अक्षय पाटील सर, प्रसाद सपाटे सर, प्राजक्ता पाटील मॅडम, अभिजीत माने यांनी महत्वाची भूमिका बजावली त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. तसेच सदर पुस्तकास मा. श्री. सुहास बुधवले, बालविकास प्रकल्प अधिकारी वाळवा पंचायत समिती, इस्लामपूर यांनी प्रस्तावना दिली त्याबद्दल त्यांचेही विशेष आभार तसेच सदर पुस्तकाला मुर्त रुप प्राप्त करून देणान्या आमच्या सहकारी सोनाली लावंघरे व या पुस्तकाला देखणे मुखपृष्ठ देणाऱ्या गायत्री दळवी तसेच हे पुस्तक आपणा सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी मोलाचा वाटा उचलणारे ‘वी पब्लिकेशनचे’ संपादक अजितकुमार सर या सर्वांचा मी ऋणी आहे. सर्व भावी शिक्षकांना स्वप्नपुर्तीसाठी मनःपूर्वक शुभेच्छ
प्रा. कृष्णा रोकडे
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.