Vidyabhartee MAHA-TAIT Prashnapatrika Sanch – 29 Prashnapatrika + 1 Sarav Prashnapatrika
मनोगत
महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली जावी यासाठी महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ अर्थात ‘MAHA TAIT चे आयोजन करते.
महाराष्ट्रातील इतर भरती परीक्षेच्या मानाने TAIT अभ्यासक्रम अधिक आहे. प्रश्नांचे स्वरूप आव्हानात्मक आहे. आजपर्यंतच्या स्पर्धा परीक्षांत आपण न अनुभवलेले (Aptitude) तसेच तार्किक क्षमता (Logic) आपल्यासाठी नवीन असल्याने अभ्यास कसा करावा ? हा प्रश्न आपल्यासमोर असतो.
2017 साली आयोजित केल्या गेलेल्या परीक्षांच्या सर्व प्रश्नपत्रिका एकत्रीत असलेला संघ विद्याथ्यांच्या
हाताशी असणे गरजेचे आहे. त्यातही जर बुद्धिमता व तार्किक प्रश्नांची आवश्यक तेथे स्पष्टीकरणे दिलेली असतील तर इतर कठल्याही मार्गदर्शकापेक्षा ते जास्त उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही. उत्तरांची स्पष्टीकरण देत असताना प्रश्नपत्रिकांतील काही संदिग्ध प्रश्नांच्या बाबतीत त्या त्या ठिकाणी सुचित केलेले आहे. मूळ प्रश्नपत्रिकेत असणाऱ्या त्रुटींमध्ये तेथे सुधारणाही केलेल्या आहेत.
मानसशास्त्र, सामान्य ज्ञान इत्यादी विषयांचे प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे व ज्ञानाधारित असल्यामुळे
त्या ठिकाणी स्पष्टीकरणे दिलेली नाहीत. तसेच त्या त्या प्रश्नपत्रिकेतील चालू घडामोडींच्या प्रश्नांबाबत
देखील विद्याथ्र्यांनी सजग असणे गरजेचे आहे.
या मार्गदर्शकात 29 प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. तसेच बुद्धिमत्ता व तार्किक प्रश्नांसंबंधी योग्य ते मार्गदर्शनही केलेले आहे. प्रश्नपत्रिकेचे फक्त स्वरूपच नाही तर आवाकादेखील लक्षात येईल. या सोबत
एक नमुना प्रश्नसंचही सरावासाठी देण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त प्रश्न आपल्या अवलोकनातून गेले तरच आपल्यासाठी यशाचा मार्ग सुलभ होणार
आहे.
या मार्गदर्शकात एकूण 6000 प्रश्न समाविष्ट आहे ज्यामुळे आपल्या तयारीसाठी एक निश्चित दिशा मिळेल व आपण संपूर्ण तयारीनिशी व आत्मविश्वासाने यशासाठीचा आपला मार्ग सहजतेने गाठू शकाल, हा विश्वास आहे.
आपल्या उज्वल भविष्यासाठी हार्दीक शुभेच्छा !
आपला -रमेश बालवाड
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.