Vahan Chalak Bharti विजयपथ वाहन चालक भरती
लेखक : सचिन दिलीप कुरुंद
प्रस्तावना
नमस्कार, विद्यार्थी मित्रांनो… आज प्रत्येक विद्यार्थी झपाटून अभ्यास करीत आहे व सध्याच्या स्पर्धेला तोंड देत आहे.
या वाढत्या स्पर्धेत दर्जेदार संदर्भ वापरणे खूप गरजेचे आहे. त्याशिवाय तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या वेगात वाहनचालक पदांची भरती होते. या परीक्षेत वाहन चालक व वाहतुकीबाबतचे नियम असा एका ओळीत अभ्यासक्रम दिलेला आहे. परंतु यामध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो. ती सर्व सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे. या अभ्यासक्रमावरील एकही प्रश्न या पुस्तकाच्या बाहेर जाणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. 2019 मध्ये झालेल्या 22 जिल्ह्याच्या वाहनचालक भरतीमध्ये 12 जिल्ह्यात 20 पैकी 20 प्रश्न याच पुस्तकातून आले होते. व 10 जिल्ह्यांत 20 पैकी 16 से 19 प्रश्न याच पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीमधून आले होते. वेगवेगळ्या परीक्षेत 20 ते 40 प्रश्नांपर्यंत या विषयावर प्रश्न येतात. आपण वाहन चालविताना काय करायचे व काय करू नये यावरच हे प्रश्न येतात. रस्त्यावरील वाहनांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामध्ये नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नाहीतर आपल्याला नियमांचे उल्लंघन केले म्हणून दंड भरावा लागेल. 2019 मध्ये झालेल्या सुधारणेनुसार नियमांच्या उल्लंघनांचे दंड खूप वाढले आहेत. आणि असे नियम मोडणे आपल्या सुरक्षिततेसाठी धोक्याचे आहे. याच नियमावर परीक्षेत प्रश्न विचारले जातात. यामध्ये वाहन चालविताना आपणाला दिसणारे वेगवेगळे चिन्ह व त्यांचा वापर, लायसन्ससाठी आवश्यक पात्रता व वेगवेगळ्या तरतुदी तसेच एखादा नियम मोडल्यानंतर भरावा लागणारा दंड याविषयी अभ्यास करणे गरजेचे आहे. या विषयासोबत परीक्षेत असणाऱ्या बाकी सर्व विषयांचा अभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे. तसेच दररोज ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांचा सराव केला पाहिजे व अवघड वाटणारे प्रश्न परत परत सोडवले पाहिजेत. यातूनच आपल्या चुका सुधारतील व येणाऱ्या परीक्षेत नक्की यश मिळेल. रिकाम्या वेळेत ज्ञानांकुर ॲकॅडमी पुणे या अॅपवरील मोफत जे दर्जेदार मटेरिअल दिले आहे त्याचा अभ्यास करावा. मागील 4 वर्षांतील झालेल्या पेपरचा बारकाईने अभ्यास करावा व त्यांचे विश्लेषण करावे. जास्तीत जास्त सराव पेपर वेळेतच सोडविण्याचा प्रयत्न करा व त्यानुसार ज्या उपघटकावर प्रश्न चुकतात तो टॉपिक मूळ पुस्तकात वाचा व त्यावरील गुण पक्का करा. कोणतेही सराव प्रश्न सोडविताना त्यातील जे अवघड प्रश्न आहेत ते इतरांकडून समजावून घ्यावेत. तसेच पेपर सोडविताना आपण केलेल्या चुका एका डायरीत लिहून ठेवाव्यात.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Reviews
There are no reviews yet.