Police Constable-40 Prashnapatrika Vinayak Ghayal
संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा है प्रकाशनाच्या विद्यार्थिप्रिय पुस्तकांपैकी एक. सात-आठ वर्षांच्या अल्पकालावधीत या पुस्तकाच्या व्याण्णव आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. इतक्या अल्पकाळात इतक्या आवृत्त्या प्रकाशित केल्या जाण्याचे भाग्य फारच थोड्या पुस्तकांना लाभते. काळाच्या गरजेप्रमाणे या पुस्तकाच्या सहाव्या विभागात पाच आदर्श प्रश्नपत्रिका उत्तरांसहित दिल्या असून सातवा विभाग पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा आहे. त्यात एकूण दहा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित दिल्या आहेत.
तथापि, सरावासाठी अन् अभ्यासासाठी आणखी काही अपेक्षित स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थिमित्रांच्या हाती सोपवाव्यात अशी एक संकल्पना अनेक दिवस मनात वसली होती. विनायक घायाळ या माझ्या तरुण मित्राने अथक परिश्रमांतून माझी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली; त्यातूनच ‘पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा चाळीस प्रश्नपत्रिका’ हे पुस्तक साकारले आहे. विनायक घायाळ यांनी लिहिलेल्या ‘समग्र चालू घडामोडी’ या पुस्तकाच्याही सत्तावीस आवृत्त्या अल्पावधीत प्रकाशित झाल्या होत्या. सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेले ‘स्मॉलेस्ट जनरल नॉलेज’ हे त्यांचे पुस्तक देखील थोड्याच अवधीत अत्यंत विद्यार्थिप्रिय ठरले आहे. या संदर्भाची संपूर्णतः सुधारित व विस्तारित सेहेचाळिसावी आवृत्ती प्रकाशित होत आहे, हे येथे लक्षात घेणे अगत्याचे आहे.
नव्या पिढीतील या अभ्यासू व मेहनती लेखकाच्या या तिसऱ्या पुस्तकाची ही छत्तिसावी आवृत्ती विद्यार्थिमित्रांच्या हाती सोपविताना मला कृतकृत्यतेचा आनंद वाटतो. हे पुस्तक आपणास शुभफलदायी ठरावे व आगामी परीक्षेतही आपणास इच्छित यश मिळावे, या शुभेच्छांसह …..
आपला, व्ही. एस. क्षीरसागर (K’Sagar)
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862 / 20224453065
Reviews
There are no reviews yet.