Suprashasan Sandhi Ani Avhane Rajeev Nandkar सुप्रशासन संधी आणि आव्हाणे
प्रशासन ही पूर्वापार चालत आलेली एक व्यवस्था असून, ती स्थिर आणि साचेबंद असते. सुप्रशासन मात्र एक व्यापक आणि विस्तृत अशी संकल्पना असून,
त्यात नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि लाभ यांचे सुलभीकरण साधले जाते. सुप्रशासन ही अशी एक निर्णय पद्धती आणि प्रशासकीय प्रक्रिया आहे की,
ज्याद्वारे नागरिकांचे कल्याण आणि सर्वांगीण सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय विकास साधला जातो. सुप्रशासन अस्तित्वात येण्यासाठी प्रशासकीय
यंत्रणा ही पारदर्शक, कार्यक्षम, परिणामकारक, सुलभ, जबाबदार, उत्तरदायी, विकेंद्रित, सहभागी, सर्वसमावेशक, समन्यायी आणि निर्णयक्षम असावी लागते.
सुप्रशासन फक्त देत नाही, तर जे दिले आहे त्यातून अनुरूप आणि आवश्यक बदल झाले का हे पाहते. सुप्रशासन हे कायम लोकोपयोगी आणि लोकाभिमुख असते.
भारतीय संविधानाला अपेक्षित असलेले ‘आम्ही भारताचे लोक’ हे तत्त्व सुप्रशासनाच्या माध्यमातूनच साध्य होते. एकंदरीत,
सुप्रशासन अस्तित्वात आणण्यासाठी कोणत्या घटकांवर कामकाज करावे याची सखोल आणि विस्तृत अशी माहिती ‘सुप्रशासन : संधी आणि आव्हाने’ हे पुस्तक आपल्याला देते.
राजीव नंदकर डेप्युटी कमिशनर, पुणे महानगरपालिका
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Reviews
There are no reviews yet.