Jilha Nyayalaya Shipai va Hamal Bharti Pariksha / Zilha Nyayalaya Shipai va Hamal Bharti Pariksha
यावर्षी जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनांवर कनिष्ठ लिपिक या पदाबरोबरच शिपाई/हमाल या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शिपाई/हमाल पदाच्या भरती परीक्षेत घेतल्या जाणाऱ्या चाळणी परीक्षेत सामान्यज्ञान, मराठी व्याकरण आणि साहित्य यांवर ३० गुणांचे ३० बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार असून १० गुणांची स्वच्छता आणि चापल्य चाचणी व १० गुणांची मुलाखत घेण्यात येणार आहे. यावरून या परीक्षेतील ३० गुणांच्या चाळणी परीक्षेचे महत्त्व ध्यानी यावे. प्रस्तुत पुस्तक हे उपरोक्त परीक्षेतील ३० गुणांच्या चाळणी परीक्षेकरिता रचना केलेले आहे. उमेदवारांची अपेक्षित किमान शैक्षणिक अर्हता लक्षात घेऊन त्यानुसार माहिती व प्रश्नांची रचना केली आहे. संबंधित परीक्षा न्यायालयातील भरतीशी निगडीत आहे, ही बाब लक्षात घेऊन तद्वतच सामान्यज्ञान या विषयाची व्यापकता ध्यानी घेऊन प्रस्तुतच्या पुस्तकात भारतीय न्यायव्यवस्था हे विशेष प्रकरण दिले असून विहित अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने अकरा प्रकरणांत पुस्तकाची रचना केली आहे.आवश्यक ते सर्व काही अन् अनावश्यक ते काही नाही, हे सूत्र जपणारा व उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार साध्या-सोप्या भाषेत परंतु परीक्षा डोळ्यां- समोर ठेवून रचना केलेला हा सर्वसमावेशक संदर्भ विद्यार्थी मित्रांना निश्चितच यशोशिखरापर्यंत घेऊन जाईल, यात काहीच शंका नाही.
शुभेच्छांसह !! K’Sagar PUBLICATIONS
Available at Ksagar Book Centre
www. ksagaronline.com or call 9545567862 / 02024453065
Reviews
There are no reviews yet.