Abhyas Mitra
₹160.00 Original price was: ₹160.00.₹128.00Current price is: ₹128.00.
Author : Yajurvendra Mahajan. Mahesh Gorade.
Edition : 6 th 2022
Language : Marathi
Publisher : Deepstambha Prakashan / दीपस्तंभ प्रकाशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Abhyas Mitra
प्रस्तावना
जीवनात यशस्वी होण्यासाठी व आयुष्य कृतार्थतेकडे नेण्यासाठी आवश्यक असलेली बाब म्हणजे अभ्यास. ज्यांचे ज्यांचे आयुष्य सामान्यांना दीपस्तंभासारखे वाटते. त्यांनी त्यांनी त्यांच्या जीवनात अपूर्व आनंदप्राप्तीसाठी अतृप्त ज्ञानलालसेने अपार कष्ट घेतले, असे सहज निदर्शनास येते.
अर्थात, अभ्यास हा आवडीने करावयाचा असतो रुची असलेला विषय माणसाला कौशल्य व पारंगतता देतो व म्हणून अभ्यासाविषयीची भूमिका प्रथम आपल्या स्वतःच्या मनावर लक्षपूर्वक आणावी लागते. कोणाला अभ्यासात कंटाळा असतो तर काहींना अभ्यासाचा हुरूप असतो. काही पुस्तकी किडे होऊनच त्यात रमतात. या सगळ्या भूमिका माणसाच्या मनाशी जोडलेल्या असतात.
कोणताही विषय सोपा वाटणे किंवा कठीण वाटणे हे कौशल्यावर अवलंबून असते.
सहजतेने केलेली गोष्ट सोपी असते व दडपणाने केलेली गोष्ट कठीण असते. म्हणून एक गोष्ट मनाशी खूणगाठ बांधून लक्षात घ्यावी व ती म्हणजे अभ्यास. हा दडपणाखाली न करता सहजतेने व्हावा. ही सहजता या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना सहज प्राप्त होऊ शकेल. एखादी गोष्ट सहज करणे म्हणजे त्या गोष्टीचे नीट आकलन होणे, मनापासून त्या गोष्टीवर आपले प्रेम असणे, ती गोष्ट आत्मसात करण्याकडे कल असणे. त्यातील साऱ्या
गोष्टी ताणविरहित करता येणे, हे करण्यासाठी अभ्यासाचे तंत्र व मंत्र दोन्हीही समजणे
आवश्यक आहे.
‘श्रद्धावानं लभते ज्ञान’ हे लक्षात घेतल्यास विद्याभ्यास करणान्याचे मन एकलव्यासारखे श्रद्धायुक्त असावे. तसेच ज्ञानाची ओढ असावी. हळूहळू त्यातील कौशल्य समजून घ्यावे. आई, वडील, शिक्षक यांच्यावर निष्ठा असावी. जे करतो त्यात चित्त असावे. हे करण्यासाठी त्या विषयात प्राथमिकतेने रुची असावी लागते.
खेळाडू जेव्हा खेळासाठी खेळतो तेव्हा त्याला सर्वाधिक आनंद मिळतो. तसेच अभ्यास हा अभ्यासासाठी असावा. असे घडले, की आनंदप्राप्ती निश्चित आहे. ‘हंसवाहिनी व ज्ञानदायिनी’ असलेली सरस्वती अशी दृष्टी निर्मळ बुद्धी प्रदान
करते. अशी निर्मळ बुद्धी या पुस्तकाचे मनापासून अध्ययन करणाऱ्याला प्राप्त करून घेता यावी, यासाठी सरस्वतीच्या चरणी आपले मस्तक टेकवूया व अशी प्रार्थना करूया, की आम्हा सर्वांना अभ्यासात आनंदाचा प्रत्यय यावा.
या अभ्यास मित्राच्या साथीने मनापासून अखंड विजयी भव व्हावे, हा मंगल शुभ आशिष,
प्रकाश गंगाधर पाठक, धुळे ज्येष्ठ विचारवंत व लेखक,
सरकार्यवाह, भोसला मिलिटरी कॉलेज, नाशिक
Available at Ksagar Book Centre
www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.