Zhapurjha Achyut Godbole झपूर्झा - अच्युत गोडबोले
Zhapurjha Achyut Godbole झपूर्झा - अच्युत गोडबोले Original price was: ₹350.00.Current price is: ₹280.00.
Back to products
Quantitative Aptitude R S Agrawal
Quantitative Aptitude R S Agrawal Marathi Original price was: ₹499.00.Current price is: ₹400.00.

Sugam Marathi Vyakaran With Shabdratn Set of 3 Books Mo. Ra. Walambe मो रा वाळंबे सुगम मराठी व्याकरण

355.00

Author        : Mo. Ra. Walambe

Edition        : New 

ISBN            : 9788186169803

Language ‏  :  Marathi

Publisher   : Nitin Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Out of stock

Join the waitlist to be emailed when this product becomes available

Description

Sugam Marathi Vyakaran With Shabdratn Set of 3 Books Mo. Ra. Walambe मो रा वाळंबे सुगम मराठी व्याकरण

लेखक : मो रा वाळंबे

संपादकीय

व्याकरणाच्या मूलभूत संकल्पना अतिशय सोप्या भाषेत समजावून देणारे पुस्तक म्हणून मो. रा. वाळंबे यांचे ‘सुगम मराठी व्याकरण व लेखन’ हे पुस्तक वर्षानुवर्षे विद्यार्थी व अभ्यासकांची पसंती आणि भरभरून प्रेम मिळवत आहे. या पुस्तकाचे बोट धरून मोठी झालेली पिढी आता पुढच्या पिढ्यांनाही याच पुस्तकाच्या आधारे शिकवत आहे. या अर्थानि हे पुस्तक आज आपल्यासारख्या सर्व मराठीजनांचे भूषणच झाले आहे. आज प्रसिद्ध होणारी अठ्ठावन्नावी आवृत्ती ही याच विश्वासाची निदर्शक म्हणता येईल.

या आवृत्तीची मुख्य वैशिष्ट्ये

पुस्तकाची संपादकीय समिती व स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी यांनी सुचवलेले अभ्यासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे काही बदल या आवृत्तीत कायम ठेवले आहेत. तसेच समास व वृत्त या घटकांत काही माहितीपर तक्ते वाढविले आहेत.

* प्रत्येक घटकाच्या शेवटी दिलेल्या स्वयंअध्ययनातील वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणी अनेक दिवस होत होती. याही आवृत्तीत प्रत्येक घटकाच्या शेवटी ती उत्तरे दिली आहेत. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने काही नवीन वस्तुनिष्ठ प्रश्न व त्यांची उत्तरेही दिली आहेत. लेखनविभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या

स्वरूपानुसार निबंधलेखनाचे विशेष मार्गदर्शन केले आहे. तसेच, परीक्षेत विचारलेल्या दोन

निबंधांचे आदर्श लेखन समाविष्ट केले आहे. याशिवाय, निबंधलेखन व विविध प्रकारच्या

उपयोजित लेखनाचे तंत्र व नमुने दिले आहेत.

वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द अशा भाषावैभवाचा संग्रह असलेले शब्दरत्न हे या पुस्तकसंचातील दुसरे पुस्तक. त्यातील अनेक घटकांमधील तपशिलात वाढ केली आहेच शिवाय, वाक्प्रचार व म्हणींचा वाक्यात उपयोग हे उपयुक्त वैशिष्ट्य कायम राखले आहे.

* मराठीच्या विविध बोली हे आपले एक भाषासंचित आहे. या ठेव्यातील मालवणी, वन्हाडी आणि अहिराणी या भाषेतील काही म्हणींचा शब्दरत्नमध्ये केलेला समावेश ही त्या दृष्टीने एक समाधानाची गोष्ट आहे.

प्रत्येक आवृत्तीच्या प्रसिद्धीच्या वेळी पुस्तकात जास्तीत जास्त परिपूर्णता आणण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि याला साथ देतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक ‘भाषातज्ज्ञ, अभ्यासक, प्राध्यापक, शिक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि असंख्य विद्यार्थी, जे आज ‘सुगम’ परिवाराचा एक भाग झालेले आहेत. त्यांचे आणि वाचक म्हणून तुम्हा सर्वाधिही मनापासून आभार.

धन्यवाद.

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.