Mental Ability And Reasoning Ability Test -Buddhimata Chachani Ani Tarkshakti Parikshan
लेखक :सचिन राजाराम ढवळे
• मनोगत •
संगणक युग ओलांडून नॅनो युगात आपण प्रवेश करता आहात. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरील तुमचे स्थान यशाच्या कौशल्यावर आधारलेले आहे. जीवनातील यश हे स्पर्धेशिवाय मिळूच शकत नाही. आपण अभ्यास करत असलेल्या स्पर्धा परीक्षेतील यशाचे कौशल्य निर्माण करण्यासाठीच ‘स्पर्धा परीक्षा संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी – क्लृप्त्या आणि सूत्रे’ ही नव्याने सुधारीत अद्ययावत आवृत्ती आपल्या हाती ठेवत आहोत.
आयोगाची (MPSC/UPSC) कोणतीही परीक्षा, AIEEE, CAT ची MBA प्रवेश परीक्षा असो वा सरळ सेवा भरतीची कोणत्याही पदाची परीक्षा असो, बुद्धिमत्ता चाचणी हा विषय अनिवार्य (Compulsary) केलेला आहे, इतकेच नव्हे तर या पदांच्या परीक्षेतील यशच बुद्धिमत्ता चाचणी विषयातील गुणांवर अवलंबून आहे. या गोष्टीचा विचार करुनच बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील परीक्षेस आवश्यक सर्व घटक या पुस्तकात एकत्रितरित्या समाविष्ट केले आहेत. हेच या मार्गदर्शिकेचे वेगळेपण व वैशिष्ट्य आहे. सुधारित आवृत्ती तयार करताना महाराष्ट्र
महाराष्ट्र/ संघ लोकसेवा
लोकसेवा आयोगाच्या विविध पदांच्या प्रश्नपत्रिका, सरळ सेवा जसे तलाठी, विस्तार अधिकारी, वरीष्ठ लिपीक, पोलीस शिपाई या पदांच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करुन प्रत्येक घटकावरील सर्व मुद्यांचा समावेश करून त्यात्या प्रश्न प्रकारांचा समावेश पुस्तकात केला आहे. जेणे करुन प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणाऱ्या विविध प्रश्न प्रकारांची ओळख तुम्हास होईल. प्रत्येक पाठातील मुद्यांची नमुना उदाहरण – त्यावरील सोपी क्लृप्ती- नियम आणि स्पष्टीकरण, नमुना उदाहरणावर आधारित त्याच प्रकारची सराव उदाहरणे – सराव उदाहरणाचे नियम -सूत्रांवर आधारित स्पष्टीकरण अचूक उत्तरसूचीसह प्रत्येक प्रश्नाखाली अशी मांडणी केली आहे. जी प्रत्येक विद्यार्थ्यांस स्वयं अभ्यासास प्रेरित करेल आणि उदाहरणे अचूकपणे कमी वेळेत सोडविण्यास मदत करेल. पाठाच्या शेवटी विविध पदांच्या परीक्षेत विचारलेले प्रश्न स्पष्टीकरणासह समाविष्ट केले आहेत.. 18 “अचूक प्रयत्न,
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.