Sampurna Ganit – Kluptya Ani Sutre संपूर्ण गणित – क्लुप्त्या आणि सूत्रे
लेखक : पंढरीनाथ राणे
मनोगत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) च्या सर्व प्रकारच्या विविध पदांसाठी होणाऱ्या प्रत्येक पूर्व किंवा मुख्य परीक्षेसाठी ‘गणित/सामान्य क्षमता चाचणी’ हा विषय अनिवार्य करणेत आला आहे. MPSC चा आधार घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळया खात्यातील जवळ-जवळ प्रत्येक परीक्षेत गणित या विषयांवर सुमारे 25% य जास्तीत जास्त 35% पर्यंत प्रश्न विचारले जातात.
महाराष्ट्र शासनातील वर्ग-1 पासून 7 ते वर्ग 4 पर्यंतच्या सर्व पदांच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून स्पर्धा परीक्षा संपूर्ण गणित’ या पुस्तकाची निर्मिती व रचना केली आहे. प्रत्येक परीक्षेतील गणित विषयाचे महत्व लक्षात घेऊनच स्पर्धा परीक्षा संपूर्ण गणित या पुस्तकाची मांडणी करताना इयत्ता 4थी ते इ. 10 वी पर्यंतच्या शालेय क्रमिक पुस्तकांचा आधार घेतला आहे. प्रत्येक प्रकारचे गणित सोडवताना सर्व प्रकारच्या ‘छोटया-छोटया क्लृप्त्या आवश्यक नियम, सूत्र व सोपी क्लृप्ती’ यांचा एकत्रित विचार करूनच प्रश्नांची रचना विद्यार्थी मित्रांना समजेल अशी सोपी, सुटसुटीत केली आहे.
“स्पर्धा परीक्षा पंढरीनाथ राणे लिखित चौताली प्रकाशन / नर्मदा प्रकाशनाच्या पुस्तकांचा अभ्यास= = हमखास यश (गुणवत्ता यादीत वरचा क्रमांक)” या सूत्रातील आखणी एक सुधारित समृद्ध परिपूर्ण मार्गदर्शक पुस्तक आपल्या हाती ठेवत आहोत. वर्ग-4 पासून वर्ग-1 पर्यंतच्या सर्व प्रकारच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा अचूक अभ्यास करून गणित विषय सहज सुलभ करून नाविण्यपूर्व अचूक परंतू अत्यंत कमी वेळात सोडविता येणाऱ्या क्लृप्त्या यांची निर्मिती व त्यावर आधारित सरावासाठी उदाहरणे हा या पुस्तकाचा मुख्य गाभा आहे.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.