Perfect Maths Basic to Advanced Part-1
लेखक :प्रा. किरण पाटील
नमस्कार मित्रांनो,
Advance level पर आधारीत Perfect Maths या पुस्तकाची प्रथम आवृत्ती प्रकाशित करतांना मला मनस्वी आनंद होत आहे. कारण Perfect बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचा दोन आवृत्यांना महाराष्ट्र भरातील विद्याथ्र्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. कारण विदयार्थ्यांची मागणी होती की गणिताच्या पुस्तकामध्ये MPSC व इतर परीक्षांमध्ये विचारलेली प्रश्न सोडवून देणे तसेच परिक्षेत कोणताही प्रश्न आला तर त्याचे उत्तर काढताच आले पाहिजे. या विदयार्थ्याच्या खास आग्रहास्तव व देशसेवा हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या पुस्तकाचे लिखाण केले आहे.
गणित हा विषय बऱ्याच मुलांना अवघड वाटतो याचे कारण त्या विषयातील मुलभूत संकल्पना (Basic Concepts) समजून घेणे आवश्यक आहे. मुलांना सराव करतांना सोडविता येते परंतु परिक्षेत मात्र सोडविता येत नाही. याचे कारण सराव करतांनाच जर Advanced level चे गणित आले तर ते आपण सोडवत नाही आणि स्पर्धा परीक्षेमध्ये नेमका त्या प्रकारचा प्रश्न येतो. म्हणूनच या पुस्तकामध्ये मी Advanced level च्या प्रश्नावर अधिक भर दिला आहे. जेणेकरून सराव करतानाच जर Advanced level चे गणित सोडविले तर परीक्षेमध्ये प्रश्न सोडवितांना प्रश्न हा Basic स्वरूपाचा असो किंवा Advanced स्वरूपाचा उत्तर मात्र काढता येईल. कारण माझे वैयक्तिक मत असे आहे की सोपी आणि सोपी पुस्तके वाचून आपण परीक्षा पास होणार नाही. परीक्षेला नेमके काय अपेक्षीत आहे हे वास्तव आपण स्वीकारले पाहिजे. तसेच या पुस्तकामध्ये जवळपास सर्वच प्रश्न मी Short Method ने सोडविले आहेत. याचा देखील विद्यार्थ्यांना 100% फायदा होणार आहे. याचा मला पूर्ण विश्वास आहे.
आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा….
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.