Deepstambh Buddhimatta Chachani
₹330.00 Original price was: ₹330.00.₹248.00Current price is: ₹248.00.
Deepstambh Buddhimatta Chachani
Author : Khemchandra Patil
Edition : 1 ST 2018
Language : Marathi
Publisher : Deepstambha Prakashan / दीपस्तंभ प्रकाशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Deepstambh Buddhimatta Chachani
लेखकाचे मनोगत….
‘दीपस्तंभ बुद्धिमत्ता चाचणी’ हे पुस्तक तुमच्यासमोर सादर करताना खूप समाधान आणि आनंद होत आहे. सर्वच स्पर्धा परीक्षांच्या पहिल्या टप्प्यातील परीक्षांचा अविभाज्य घटक म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी व त्यावरील प्रश्नांचे बदलते स्वरूप बघता विद्याथ्यांच्या मनातील शंका आणि संभ्रम दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न पुस्तकात केला आहे. पुस्तकातील प्रत्येक प्रश्न व त्याचे स्पष्टीकरण विद्यार्थ्याला समजेल आणि सहज आत्मसात होईल, या पद्धतीने मांडणी केली आहे.
खेमचंद्र जानकीराम पाटील-
प्रिय विद्यार्थी मित्रांना एकच विनंती, की पुस्तकातील प्रत्येक प्रकरण अनुक्रमणिकेप्रमाणे सर्व स्वाध्यायः सोडविण्याचा स्वतः प्रयत्न करा. त्यानंतर नाही जमले तर उत्तरे व स्पष्टीकरणांचा आधार घ्या. माझी पूर्ण खात्री आणि विश्वास आहे, की या पद्धतीने पुस्तकाचा वापर केल्यास बुद्धिमत्ता चाचणी हा तुमचा हक्काचा विषय होईल, मग तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असाल तरी काहीही फरक पडत नाही. सातत्य आणि स्वतःवरील विश्वास ही तत्वे पाळल्यास यश निश्चित मिळेल. त्यासाठी आपणास मनापासून शुभेच्छा. अभ्यासांतर्गत पुस्तकात काही चुका किंवा दुरुस्त्या आढळल्यास जरूर कळवा.
‘तुज पंख दिले देवाने, कर विहार मात्र सामथ्र्याने ‘
या उक्तीप्रमाणे माझ्यातील सामय्यांची जाणीव यजुर्वेद महाजन सर तसेच माझे सासरे आबासाहेब सुरेश पाटील ( Rtd. SBI), प्रा. सुरेश पांडे यांनी करून दिली. त्यामुळेच हा लेखनप्रपंच मी यशस्वीपणे पूर्ण करू शकलो. त्याचप्रमाणे माझे सहकारी, मित्र संजय देशमुख, जयदीप पाटील, डॉ. किरण देतले, पांडुरंग कोठुडे, प्रविण चव्हाण (IRS), सुयोग नगरदेवळेकर (Manager, SBI), चंद्रशेखर बोर्ड (STO), संदीप पाटील, राम पाटील, डॉ. हर्षल कुलकर्णी, दिलीप पाटील, दीपक बाविस्कर, किरण बाविस्कर, धनंजय मंगरुळकर, नरेंद्र पाटील, डॉ नरेंद्र पाटील, अनिल पाटील, अशोक बाविस्कर, संदीप ठाकरे, भूषण घोळके, ईश्वर पाटील, देवलसिंग पाटील, पंडितराव गावंडे, सविता भोळे, शेखर सोळंक तसेच प्रकाशन विभाग प्रमुख जगदिश महाजन, श्रीकांत तायडे, सुनील पाटील व दीपस्तंभ टीम यांचे बहुमूला मार्गदर्शन क प्रोत्साहन मिळाले. तसेच माझे विद्यार्थी उमेश पिसे (Bank PO), श्रद्धा आणि दोन लहान व खूप हुशार विद्यार्थी हिमांशु सादुलवाड आणि पार्थ यांचेही अमूल्य सहकार्य लाभले. माझी आई, बहीण (वैशाली पाटील), मेहुणे (किशोर पाटील), माऊ (घनश्याम पाटील), वहिनी (माधुरी पाटील), माझे जिवलग मित्र किरण निकम, शिल्पा निकम व विलास पाटील यांचेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळाले.
सदर लेखनप्रपंच पत्नी सौ. सीमाच्या मदतीशिवाय पूर्ण होणे अशक्य होते. तिने वेळोवेळी सुचविलेले बदल उल्लेखनीय व आवश्यक होते. तिचेही मनःपूर्वक आभार. या पुस्तकातील सर्व माहितीचा उपयोग करून आपणास प्रशासकीय सेवेतील अतिउच पद मिळावे, ही सदिच्छा..
धन्यवाद!
Available at Ksagar Book Centre
www. ksagaronline.com
or call on 9545567862/02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.