Bhugol va Paryavaran Vitthal Pungale भूगोल व पर्यावरण (भारत व जग)
लेखक : विठ्ठल पुंगळे प्रकाशन : वेदिका पब्लिकेशन
दोन शब्द…
भूगोल म्हणजे पृथ्वी मानव यांच्या परस्पर संबंधाचे शास्त्र होय. विविध प्रकारच्या माहितीची जंत्री म्हणजे कोणतेही शास्त्र होऊ शकत नाही. त्यात कार्यकारणभावाचा संबंध असावा लागतो. भूगोलाच्या अभ्यासात भूआकार, पाणी, जमीन, हवामान, वनस्पती, प्राणी, खनिज इ. भौगोलिक घटकांचा अभ्यास करतात हे सर्व मुद्दे नैसर्गिक परिसर नावाने ओळखले जातात. कोणतेही शास्त्र विकसित होताना निरीक्षण, संशोधन, वर्गीकरण या वेगवेगळ्या अवस्थांतून क्रमाक्रमाने जात असते. भूगोल विषयाचा विकास या पद्धतीनेच झालेला आहे. भूगोल या विषयाचा अभ्यास करतांना नकाशा समोर ठेवून अभ्यास केल्यास विविध संकल्पनाचे आकलन लवकर होते तसेच त्या प्रदेशाचे पृथक्करणात्मक विश्लेषण करणे सोपे जाते. अक्षांश- रेखांश, भूरूपे, हवामान इत्यादी बेसीक संकल्पना मुळातून समजली असेल तर त्याचा अन्वयार्थ लावणे सोपे जाते. एखादा प्रदेश आणि त्याचा सजीवांवर, त्यांच्या जैवविविधतेवर होणारा परिणाम अभ्यासता येतो. पर्यावरण, प्रदूषण ते जागतिक तापमानवाढ इत्यादी बदलत्या संकल्पनाचे ज्ञान होते.
भूगोल व पर्यावरण (भारत, जग) हे पुस्तक आपल्या हाती देताना अत्यानंद होत आहे. कोणतीही स्पर्धा परीक्षा असो त्यात भूगोल विषयावर प्रश्नांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. या विषयाचा आवाका खूप मोठा आहे; परीक्षाभिमुख अभ्यास व्हावा म्हणून विषयातील सर्व मुद्यांना Factual पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी केंद्रबिंदू मानून या पुस्तकाची रचना केलेली आहे. पुस्तकातील भाषा अवजड वाटणार नाही याची काळजी घेतलेली आहे, तसेच संकल्पना समजण्यासाठी जागोजागी पर्यायी शब्दांचा वापर केलेला आहे. प्रत्येक प्रकरणात Update माहिती दिलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना अधिकाधिक स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. त्या दृष्टीने आतापासूनच वेगवेगळ्या भौगोलिक संकल्पना स्पष्टीकरणासह पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी नकाशे, तक्ता यांचा पुरेपूर वापर केलेला आहे. विद्यार्थ्यांना आकलन लवकर व्हावे यासाठी स्पष्टीकरणात्मक, वर्णनात्मक, प्रकल्प पद्धतीचा जागोजागी वापर केलेला आहे. त्यामुळे संकल्पना व विषयाचे अनेक आयाम एकाच वेळी शिकण्याची दृष्टी विकसित होणार आहे. हे पुस्तक MPSC-UPSC तसेच इतर केंद्रिय परिक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे पुस्तक लिहिताना अनेकांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत झालेली आहे. त्यांचे मी या निमित्ताने आभार मानतो. तसेच पुस्तक आणखी चांगले होण्यासाठी विद्यार्थी मित्रांच्या सूचनांचे स्वागत करतो..
विठ्ठल विनायकराव पुंगळे
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.