The Best English Grammar ( General ) द बेस्ट इंग्लिश ग्रामर रामदास वाघ
लेखक : रामदास वाघ
दोन शब्द
THE BEST ENGLISH GRAMMAR आणि विद्यार्थी यांचे नाते अतूट का ?
इंग्रज गेले, पण इंग्रजीचा ठसा कायमस्वरूपी भारतात सोडून गेले. स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवातीला इंग्रजी भाषा अभ्यासकांना डोकेदुखी वाटू लागली होती. ‘इंग्रजी हटावचे नारे सुद्धा अधूनमधून ऐकू यायचे. हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराची मोहीम मग अधिकाधिक जोर धरु लागे. पण काळ झपाट्याने बदलतो. क्रांतिकारक परिवर्तने होऊ लागलीत, सुरुवातीची डोकेदुखी आंतरराष्ट्रीय संबंधाचा एक अविभाज्य घटक बनेल असे कोणाला वाटलं होतं का? काळाच्या उदरात काय दडले आहे कोणास ठाऊक. शेवटी कालाय तस्मै नमः ।
अफाट व्याप्तीचे जग माणसाने विज्ञानाच्या मदतीने कवेत घेतले, नजरेच्या क्षितिज सामावले अन् अचानक त्याला विज्ञानाचे बोट धरून चालताना एक साक्षात्कार झाला. आपण आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी इंग्रजीचे बोट दुसऱ्या हाताने घट्ट पकडले पाहिजे. विज्ञान आणि इंग्रजी या दोघांच्या मदतीनेच विश्वव्यापार व संस्कृतीसंबंध दृढ करता येऊ शकतात, याचे भान त्याला झाले. यासाठी इंग्रजी हा विषय आपल्या शैक्षणिक जगताचा एक अनिवार्य आणि अविभाज्य घटक बनला. म्हणूनच तर महाराष्ट्रात पहिलीपासून इंछाजी हा विषय प्रा. रामकृष्ण मोरे यांनी सक्तीचा केला. ही सुध्दा शैक्षणिक विश्वाला त्यांनी दिलेली एक अनमोल भेंटच आहे. हे अनमोल रत्न तेजस्वी ठेवण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. आपण सुध्दा इंग्रजीच्या सखोल अभ्यासाने जगाच्या जवळ जाऊ शकतो अन् म्हणू शकतो हे विश्वचि माझे घर.
चला तर मग, लागू इंग्रजीच्या अभ्यासाला. इंग्रजी भाषा ही वाघिणीचे दूध आहे. हे दूध आपण प्राशन केले, तर आपण सुध्दा डरकाळी फोडू शकतो. आजचे युग स्पर्धेचे युग आहे. प्रत्येकाच्या समोर Career आ वासून उभे आहे. आपल्या उच्चल भविष्यासाठी प्रत्येकाची धडपड चालू आहे. तुमच्या यशात या पुस्तकाचाही खारीचा वाटा असावा अशी माझी सदिच्छा आहे
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.