Pragati English Grammar – B. S. Kale ( प्रगती इंग्रजी व्याकरण )
लेखक : – बी.एस. काळे
आजच्या गतिमान कालखंडात आणि स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक बनलेले आहे. वाक्यरचना सुकर होण्यासाठी व्याकरणाची आवश्यकता आहे. परीक्षेत व्याकरण विभागावर प्रश्न विचारले जातात आणि इतर प्रश्नांची उत्तरे बिनचूक
लिहिण्यासाठी व्याकरणाची माहिती असणे आवश्यक आहेच.
लांबलचक शब्द, प्रामुख्याने नाम किंवा सर्वनाम त्यांच्याऐवजी पुरुषवाचक सर्वनामांचा वापर केलेला आहे किंवा नवीन शब्द वापरलेले आहे. तसेच दोन किंवा अधिक नामांऐवजी पुरुषवाचक सर्वनामांचा उपयोग केलेला आहे. आवश्यक तेथे वेगळा नवीन शब्द वापरलेला आहे.
संभाषण, वादविवाद किंवा चर्चा करताना आणि पत्रलेखनासारखे लेखन करतानाही बिनचूक रचना करणे आवश्यक आहेच. ते सविस्तर दिले आहे. याच कारणाकरिता सर्व विभाग तपशीलवार व नवीन अभ्यासक्रमानुसार सुधारित देण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. दैनंदिन जीवनातील प्रसंगानुसार व पाठ्यपुस्तकांचा
उपयोग करून शब्द, वाक्ये आणि रचना यांचा समावेश केलेला आहे..
व्याकरणातील संज्ञांची व्याख्या किंवा इतर नियम पाठ करण्याची आवश्यकता नाही.
परंतु स्पष्टपणे अर्थ समजणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून वाक्यरचना जाणून घ्या आणि
स्वत: वापर करण्याचा प्रयत्न करा.
ग्रामीण भागातील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन सुलभता वाढविलेली आहे. नवीन अभ्यासक्रमावर आधारित उदाहरणे व प्रश्न यांचे विविध प्रकार सुधारित विस्तृत माहितीसह देऊन सर्वांसाठी उपयुक्तता वाढविलेली आहे.
अधिक सराव म्हणजे अधिक उपयुक्तता !
प्रगती इंग्रजी व्याकरण म्हणजे हमखास यशाची खात्री !
– B. S. Kale
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.