Mansik Kshamta Kasoti मानसिक क्षमता कसोटी
लेखक : श्री. वा. ना. दांडेकर,
श्री. वा. ना. दांडेकर, निड्स शिक्षण संचालक (गोवा) हे एक शिक्षणतज्ज्ञ म्हणून महाराष्ट्रातील शिक्षक वर्गाला परिचित आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामध्ये विविध पदांवर त्यांनी ३० वर्षे काम केले. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केले त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. गोवा संघ प्रदेशाचे शिक्षण संचालक म्हणून दोन वर्षे त्यांनी काम केले आणि तेथूनच १९८० साली ते सेवानिवृत्त झाले.
१९७६ ते १९७८ या कालाधीत शासकीय परीक्षा मंडळाचे ते आयुक्त होते. त्यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एक नवीन आकृतिबंध तयार करून त्यामध्ये (बुद्धिमत्ता चाचणी) या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा अंतर्भाव केला. या आराखड्यानुसार बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका १९७८ च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रथमच समाविष्ट करण्यात आली. साहजिकच विविध स्पर्धा परीक्षांसाठी या विषयाचा फायदा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना होऊ लागला.
शिक्षक संचालक या पदावरुन १९८० साली निवृत्त झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील निरनिराळ्या जिल्ह्यांमध्ये विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यासाठी शिबिरे घेऊन मार्गदर्शन केले. मागील २५ वर्षांमध्ये २०० पेक्षा जास्त उद्बोधन शिबिरांमध्ये त्यांनी मार्गदर्शन केले. वयाची ८० वर्षे पूर्ण केल्यावरही मार्गदर्शनाचे त्यांचे हे काम अद्यापही चालू आहे.
शैक्षणिक मानसशास्त्र, मूल्यमापन, संख्याशास्त्र, बुद्धिमत्ता, गणित इत्यादी विषयांवर त्यांनी इंग्रजी व मराठीमधून जवळजवळ ५० पुस्तके लिहिली आहेत. पुस्तकातील ओघवती भाषा व आकर्षण लेखनशैली यांमुळे ही पुस्तके अतिशय लोकप्रिय झालेली आहेत. तुमच्या या पुस्तकांमुळे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळाले असे अनेक विद्यार्थी आवर्जून सांगतात.
अध्यापन हे प्रेरणादायी झाले पाहिजे हा त्यांचा आवडता सिद्धांत आहे. अध्यापन ही एक आनंददायी प्रक्रिया, असे ते मानतात. यशस्वी अध्यापनाचे गमक म्हणजे विद्यार्थी स्वयंअध्ययनाला प्रवृत्त होणे हे होय, अशी त्यांची धारणा आहे.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.