English Grammar -Aniket Patil
लेखक : अनिकेत पाटील
मनोगत…
प्रिय मित्र / मैत्रिणींनो,
खरंतर माझ्यासाठी मनोगत लिहिणे, हे पुस्तक लिहिण्यापेक्षा
अवघड आहे. कारण सांगण्यासारखे भरपूर आहे पण ते सर्व इ
लिहीले शक्य नाही. माझ्या मते, “मनुष्याचे जीवन म्हणजे त्याला
आलेल्या अडचणी व त्या अडचणींना त्याने दिलेला प्रतिसाद होय.”
MPSC क्षेत्रात अभ्यास करताना माझ्यासमोर आलेली सर्वात मोठी
अडचण म्हणजे इंग्रजी विषय व त्याला दिलेला प्रतिसाद म्हणजे हे
पुस्तक असे मला वाटते.
MPSC च्या पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना ‘अर्थशास्त्र’ ह्या विषयाने अक्षरश: हैराण करून सोडलं होतं. जेमतेम मगजमारी करून ‘अर्थशास्त्र’ चांगलं केलं. पूर्व परीक्षा पास झालो यात “इंग्रजी” हा अर्थशास्त्राहून दुपटीने अवघड विषय समोर उभा होता. अर्थशास्त्र तरी मराठी भाषेत असल्यामुळे काही ना काही समजायचं पण इंग्रजी तर आपली आधाय नाही त्यामुळे वाचून काही कळेना. जसे तसे करत इंग्रजीचे दोन पुस्तके वाचले, सर्व नियम तोंडपाठ केले. मात्र जेव्हा प्रश्न सोडवायला लागलो, तेव्हा एकाही प्रश्नाचे उत्तर काढता येईना. गला रात्री झोप येत नव्हती. डोक्यात तेच विचार येत रहायचे, ‘नेमकं चुकतं काय आहे?’ पण मला एक गोष्ट लवकर समजली, ती म्हणजे MPSC मध्ये इंग्रजीत गुण मिळविल्याशिवाय पोस्ट मिळू शकत नाही. त्यामुळे घाबरून जाणे हा पर्यायच नव्हता, मग करायचं काय? मग मी जे प्रश्न विचारतात (आयोग) त्यांना नेमकं काय पाहिजे ते शोधू लागलो, ते मिळणार कुठे? तर त्यांनीच विचारलेल्या प्रश्नांमध्ये (PYQ’s). आता पुस्तक वाचण्यापेक्षा आयोगाचे प्रश्न वाचण्याचा विचार केला. इंग्रजीच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका मिळतील त्या सर्वांच्या प्रिंट काढून दोन महिने फक्त आयोगाच्या प्रश्नांचे निरीक्षण केले. आधीतर सर्वच वाक्य मला सारखे व बरोबर वाटायचे, मात्र ह मला फरक समजायला लागला. थोड्या दिवसात पुस्तकातून पाठ केलेले नियम तिथे वापरता यावा लागले, तसा इंग्रजीविषयी आत्मविश्वास पण वाढला. हे सर्व काही लगेच झालं नाही. यासाठी भरपूर रात्री झोपेविना काढाव्या लागल्या व खूप दिवस जेवणाशिवाय पुस्तके बघण्यात गेलीत जाणि ह्या सर्व गोष्टींची किरात पण मोजावी लागली. एकाच विषयाला इतका वेळ गेल्यामुळे मी ज्या तीन मेल्सला बसलो होतो त्या तिन्ही मेन्स नापास झालो. इंग्रजी तर चांगलं झालं पण वाकी विषयांना वाचायला वेळ न मिळाल्याने मेन्स पास झालो नाही व २०१७ मध्ये तिन्ही पोस्ट मिळाल्यापासून वंचित राहिलो.
इंग्रजीचा अभ्यास चांगला झाल्याने आत्मविश्वास वाढलेला होता. त्यामुळे जळगांवमध्ये मराठी- इंग्रजी विषयाचे क्लासेस सुरू केले. क्लास घेतांना मला एक गोष्ट समजली की इंग्रजी विषय ही फक्त माझी अडचण नव्हती, हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्याथ्यांसमोर असलेले संकट आहे. डोक्यात विचारचक्र सुरू झालं. जो मुलगा एवढी अवघड पूर्व परीक्षा पास होतो, तो इंग्रजी या विषयासमोर गुडघे का टेकत असेल? त्याचं कारण माझ्या लक्षात आले. एक तर ती आपली भाषा नाही त्यामुळे इंग्रजी
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.