State Board Revision Prashnasanch Rohit Dandagaval/Sandip Waghmare
State Board Revision Prashnasanch Rohit Dandagaval/Sandip Waghmare Original price was: ₹350.00.Current price is: ₹210.00.
Back to products
UPSC IAS Prelims 31 Year Solved Papers 1 and 2 (1995-2025) Dr.Mrunal Patel in (HINDI)
UPSC IAS Prelims 31 Year Solved Papers 1 and 2 (1995-2025) Dr.Mrunal Patel in (HINDI) Original price was: ₹900.00.Current price is: ₹675.00.

Samajshastra Vaikalpik vishay(Sociology) UPSC 2000 To 2024 MPSC 2006 TO 2011 Shivaji Kae

Original price was: ₹150.00.Current price is: ₹105.00.

Author         :   Shivaji Kale

Edition         :   2025

Language  ‏  :   Marathi-English

Publisher: ‎ :  Unique Academy

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Samajshastra Vaikalpik vishay(Sociology) UPSC 2000 To 2024 MPSC 2006 TO 2011 Shivaji Kae

संघ लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) आयोजित केली जाणारी सनदी सेवा परीक्षा (Civil Services Examination) ही तिच्या गतीशील स्वरूपासाठी नावाजली जाते. या परीक्षेची एक सुस्पष्ट व्यवस्था व रचना असली तरी त्यातील प्रत्येक टप्प्यावर (विशेषतः पूर्व व मुख्य परीक्षा) दरवर्षी नव्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे परीक्षेतील पेपर्स, विषय आणि त्यांचा अभ्यासक्रम सर्वश्रुत (सर्वांना माहित) असला तरी त्याबर बिचारले जाणारे प्रश्न सतत बदलणारे असतात. या परीक्षांचा विशिष्ट पॅटर्न बनू नये आणि विद्यार्थ्यांच्या विचार क्षमतेचा कस लागावा, हा या मागील प्रमुख हेतू दिसून येतो

वस्तुतः लेखी स्वरूप (वर्णनात्मक) असलेली मुख्य परीक्षा सनदी सेवा परीक्षेच्या व्यवस्थेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरतो, कारण त्यास बरेच महत्त्व दिलेले असून त्याची व्याप्तीही मोठी आहे. त्यामुळे मुख्य परीक्षा हा उमेदवाराच्या तयारी प्रक्रियेतील मध्यवर्ती भाग ठरतो. मुख्य परीक्षेत निबंधाचा एक पेपर, सामान्य अध्ययनाचे चार पेपर्स याशिवाय एका वैकल्पिक विषयाचे दोन पेपर्स समाविष्ट आहेत. या सर्व वैकल्पिक विषयांची सुरुवातीपासूनच योग्य आणि परीक्षाभिमुख तयारी करण्यासाठी त्याचे सुस्पष्ट व अचूक आकलन महत्त्वपूर्ण ठरते. त्या दृष्टीने या विषयाच्या अभ्यासक्रमाबरोबरच त्यावर विचारण्यात आलेल्या आतापर्यंतच्या (गतवर्षीय) प्रश्नांचे वाचन व आकलन पायाभूत ठरते. गतवर्षीय प्रश्नपत्रिका सुरुवातीपासूनच बारकाईने पाहत गेल्यास अभ्यासाला योग्य दिशा देता येईल आणि अभ्यासाची व्याप्ती व खोली नेमकी किती व कशी असावी याचाही अंदाज बांधता येईल.

म्हणूनच ‘युनिक अॅकॅडमी’ प्रकाशनाने संघ लोकसेवा आयोगाच्या सनदी सेवा परीक्षेतील मुख्य परीक्षेच्या वैकल्पिक विषयांपैकी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, भूगोल, इतिहास, समाजशास्त्र आणि लोकप्रशासन या काही विषयांच्या 2000 ते 2024 या काळातील सुमारे 25 प्रश्नपत्रिकांचा वर्षनिहाय प्रश्नसंच पुस्तकरूपाने उपलब्ध करून देण्याचे ठरवले.

अर्थात, आयोगाच्या मूळ प्रश्नपत्रिका केवळ इंग्रजी व हिंदी या दोन भाषा माध्यमातूनच छापलेल्या असतात. इंग्रजीची पार्श्वभूमी नसलेल्या आणि मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रश्नपत्रिका समजून घेणे प्रारंभी कठीण आणि वेळखाऊही ठरते. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन युनिक अॅकॅडमी प्रकाशनाने या प्रश्नांचा मराठीत अनुवाद करून त्याचे पुस्तक निर्माण केले आहे.

प्रश्नसंच मालिकेतील प्रस्तुत पुस्तकात 2000 ते 2024 या सालातील ‘समाजशास्त्र’ या वैकल्पिक विषयाच्या प्रश्नपत्रिकांचा मराठीत अनुवाद केला आहे. तसेच या पुस्तकात UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेतील प्रश्नाबरोबरच 2013 सालापूर्वीच्या MPSC च्या वर्णनात्मक मुख्य परीक्षेतील प्रश्नदेखील त्या त्या घटकाखाली प्रकरणनिहाय वर्गीकरण करून दिले आहेत. थोडक्यात, हे पुस्तक मागील प्रश्नपत्रिकांचे केवळ संकलन नाही तर त्या प्रश्नांचे अभ्यासक्रमाला अनुसरून घटकनिहाय वर्गीकरण असलेले देखील आहे. त्याचप्रमाणे मूळ इग्रजी प्रश्नही मराठी प्रश्नाखाली दिल्यामुळे प्रत्यक्ष परीक्षेतील इंग्रजी प्रश्न समजून घेण्याची क्षमतादेखील विकसित होईल, याची काळजी घेतली आहे. या प्रश्नांचा मराठी अनुवाद मूळ संज्ञा व संकल्पनाच्या आशयास धका नलावता मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सहज समजेल, असा केला आहे.

संघ लोकसेवा आयोगाच्या गतवर्षीय प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यामुळे संबंधित विषयाचा अभ्यास कसा करावा याचीही स्पटता येईल. एवढेच नव्हे तर त्या विषयातील कोणत्या भागावर वारंवार प्रश्न विचारले आहेत आणि कोणत्या भागावर कमी प्रश्न विचारले आहेत हे लक्षात घेऊन येणाऱ्या परीक्षेसाठी कोणत्या भागावर विशेष लक्ष केंद्रीत करायचे हे निश्चित करणे शक्य होईल.

एकदर विचार करता ‘समाजशास्त्र या विषयासाठी पाठपुस्तके, संदर्भ पुस्तके आणि वर्तमानपत्रे, नियतकालिक इत्यादी विविध स्त्रोतांतून नेमके काय व कसे वाचन करायचे हे समजून घेण्याचा मार्गचा प्रश्नचाच्या पुस्तकातून सापडावा, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे हे पुस्तक सनदी सेवा परीक्षांच्या तयारी प्रक्रियेत मूलभूत प्रारंभ बिंदू ठरेल, अशी खात्री वाटते.

शेवटी, आणखी एक महत्त्वपूर्ण बाब नमूद करणे अगत्याचे ठरते, ती म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेची बदललेली रचना होय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यसेवा परीक्षेची रचना व अभ्यासक्रम स्वीकारल्यामुळे समाजशास्त्रावरील या प्रश्नसंच पुस्तकाचा उपयोग राज्यसेवा मुख्य परीक्षतील समाजशास्त्राच्या तयारीसाठी देखील होणार हे निश्चित! आयोगाने रचना व अभ्यासक्रम तर बदलला, मात्र त्यावर गतवर्षीय प्रश्नपत्रिका संच उपलब्ध नसल्यामुळे, या रचनेत कसे प्रश्न येतील याची विद्याथ्यांना उत्युक्ता व धास्तीवजा कुतूहल वाटत असणार. त्यावरील एक उपाय म्हणजे या पुस्तकातील प्रश्नांचा आधार होय. त्यामुळे संघ लोकसेवा आयोगाच्या समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाच्या गतवर्षीय प्रश्नांचे आकलन सख्या राज्यसेवा परीक्षेच्या तयारीतही मार्गदर्शक ठरेल हे निश्चित !

ation Books from SociologyAvailable at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862

Additional information
Language

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.