Samajshatra Parichay -Introduction to Sociology :समाजशास्त्र परिचय प्रा.पी.के.कुलकर्णी
लेखक :प्रा.पी.के.कुलकर्णी
डॉ.दिलीप खैरनार
प्रस्तावना
पुणे विद्यापीठाच्या बी. ए. (प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित अभ्यासक्रमावर ● आधारित ‘समाजशास्त्र परिचय’ हे पुस्तक प्रकाशित करताना आत्यंतिक आनंद होत आहे. अत्यंत अल्प अशा कालावधीत लिहून पूर्ण केलेले हे बहुतेक माझे पहिलेच असावे. अर्थात त्यामुळे या पुस्तकातील काही प्रकरणांच्या लिखाणाचे काम माझी पत्नी सौ. प्रतिभा कुलकर्णी हिने न कुरकुरता केल्यामुळेच अल्पावधीत पुस्तक लिखाणाचे काम मी पूर्ण करू शकलो. तिचे आभार. पुस्तक
नेहमीप्रमाणेच सिद्धीविनायक महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. वंदना पलसनी, प्राचार्या डॉ. पुष्पा रानडे, त्यांच्या ग्रंथपाल प्रा. फरिदा सैय्यद, माझे मित्र डॉ. बी. आर जोशी, स्वाध्यायमधील माझे सहकारी प्रा. धनंजय व प्रा. दिलीप महाजन, स. प. महाविद्यालयातील प्रा. विद्या जोशी आणि डायमंड पब्लिकेशन्सचे संचालक श्री. दत्तात्रेय पाष्टे यांनी संदर्भ उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे.
पुस्तक लिहिण्याच्या माझ्या या उपक्रमात माझे कुटुंबीय सतत माझ्या पाठीशी असतात. त्यात सौ. प्रतिभा, चि. सतीश व सौ. निवेदिता (मुलगा व सून) प्रा. सौ. भारती व अॅड मिलिंद सहस्त्रबुद्धे (मुलगी व जावई) सौ. ज्योती व श्री. सुहास जोशी (मुलगी व जावई) यांचा समावेश होतो. त्यांना आवडणार नाही, तरीही त्यांचे आभार मानतो.
डायमंड पब्लिकेशन्सचे श्री. दत्तात्रय पाष्टे यांनी मोठ्या विश्वासाने माझ्याकडून पुस्तक लिहून घेतले, त्यांचाही मी आभारी आहे.
पुस्तक प्रकाशनाशी संबंधित सर्व ‘डायमंड पब्लिकेशन्सच्या’ कर्मचाऱ्यांचे व मुखपृष्ठकारांचेही मी आभार मानतो, कारण त्यांच्यामुळेच पुस्तक सुबक झाले. धन्यवाद !
पी. के. कुलकर्णी
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Reviews
There are no reviews yet.