Bhartatil Samaj Prashna ani Samasya : भारतीय समाज प्रश्न आणि समस्या
लेखक :डॉ.सुनील मायी
मनोगत
डायमंड पब्लिकेशन्सतर्फे प्रसिद्ध होणारे हे माझे तिसरे पुस्तक. यापूर्वी ‘समाजशास्त्राची ओळख’ व ‘सामाजिक संशोधन पद्धती’ या दोन पुस्तकांचे वाचकांनी ज्याप्रमाणे स्वागत केले तसेच स्वागत ‘भारतीय समाज : प्रश्न आणि समस्या’ या माझ्या तिसऱ्या पुस्तकाचेही होईल अशी अपेक्षा मी बाळगतो.
समाजशास्त्रामध्ये समाजातील विविध प्रकारच्या सामाजिक समस्यांचा अभ्यास केला जातो ते समाजशास्त्राचे कर्तव्यच आहे. याशिवाय मनुष्य ज्या समाजात राहतो त्या समाजातील नेमके प्रश्न कोणते आहेत याची जाणीव प्रत्येक व्यक्तीला असणे महत्त्वाचे आहे. परिणामस्वरूप महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांमध्ये समाजशास्त्र विषयान्तर्गत सामाजिक समस्यांचा अभ्यास केला जातो. या पुस्तकातही ठळक काही समस्यांचा मागोवा घेतलेला आहे. सगळीकडे शक्यतोवर अतिशय सोपी भाषा वापरलेली आहे.
डायमंड पब्लिकेशन्सचे श्री. दत्तात्रेय पाष्टे यांनी हे पुस्तक अत्यंत देखण्या स्वरूपात काढले. मी त्यांचा व त्यांना या कामी सहकार्य करणाऱ्या त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा आभारी आहे.
पुस्तकातील त्रुटी तज्ज्ञ व्यक्तींनी लक्षात आणून दिल्या तर आनंदच वाटेल, पुढच्या आवृत्तीत त्या टाळता येतील.
माझी पत्नी सौ. माधुरी मायी हिने न कंटाळता हस्तलिखिताचे बरेचसे काम केले. परिणामी, पुस्तक लवकर पूर्ण होऊ शकले. पुण्यात शिकत असलेला मुलगा हर्षल यानेही आवश्यक तेव्हा डायमंडच्या कार्यालयात जाण्यास कंटाळा केला नाही. मुलगी भैरवी हिने काही उताऱ्यांचे इंग्रजीत रूपांतर करून दिले- या सगळ्यांना धन्यवाद.
सर्वांकडून मी अशाच सहकार्याची अपेक्षा करतो.
प्रा. डॉ. सुनील मायी प्रपाठक व विभागप्रमुख समाजशास्त्र विभाग बेंडाळे महिला महाविद्यालय
डॉ. अण्णासाहेब जी. डी. जळगाव.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Reviews
There are no reviews yet.