Pragat Samajik Snashodhan Paddhati Va Sankhiki : प्रगत सामाजिक संशोधन पध्दती व सांख्यिकी
लेखक :डॉ.दिलीप खैरनार
मनोगत
मानवाच्या इतिहासाइतकाच मानवाचा ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न जुना आहे. कारण ज्ञान संपादन करणे, ही मानवाची स्वभावप्रवृत्तीच असल्यामुळे प्राचीनतम कालखंडापासून तो ज्ञानप्राप्तीसाठी विविध साधनांचा वापर करून ज्ञानप्राप्त करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. सामान्य नियमांच्या आधारे अभ्यास करून आपले वर्तमानकालीन व भविष्यकालीन जीवन सुसह्य बनविण्याचा प्रयत्न मानव सातत्याने करीत आला आहे. आधुनिक काळातील शोधामागे एक शास्त्रोक्त प्रवृत्ती आहे. नैसर्गिकशास्त्राप्रमाणेच सामाजिक शास्त्रातही शास्त्रोक्त प्रवृत्ती जोपासली जाऊन तिच्या आधारेच सामाजिक घटनांबाबत संशोधन करण्यात येऊ लागले आहे. सामाजिक संशोधनात वस्तुनिष्ठता राखणे कठीण आहे. परंतु वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून सामाजिक घटनांचे शास्त्रीयदृष्ट्या अध्ययन करून नवीन ज्ञान प्राप्त करणे शक्य होते. ही वैज्ञानिक संशोधन पद्धती काय आहे? तिचा संशोधनात कसा वापर करावा?. या संबंधीची विस्तृत मांडणी सदर ग्रंथात करण्यात आली आहे.
सामाजिक शास्त्रातील संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या संशोधन पद्धतीची मांडणी तसेच सांख्यिकीय विश्लेषण, संशोधनासाठी उपयुक्त संगणकीय सॉफ्टवेअर प्रणाली, तथ्यांचे आलेखीय प्रस्तुतीकरण इ. बाबी मराठी भाषेत सोप्या पद्धतीने वाचकांपर्यंत पोहोचवाव्यात या उद्देशाने ग्रंथ लेखन केले आहे.
सामाजिक शास्त्रांतर्गत सर्वच विषयासाठी पदवी व पदव्युत्तर स्तरावर ‘सामाजिक संशोधन पद्धती’ हा अभ्यासक्रम शिकविण्यात येतो. तसेच एम.फिल., पीएच.डी. पदवीकरिता संशोधन करणाऱ्या संशोधकांना संशोधनाचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी सामाजिक संशोधनासंबंधीचे नवीनतम ज्ञान सरळ व सोप्या पद्धतीने उपलब्ध करून द्यावे, असा प्रेमपूर्वक आग्रह आमचे मित्र डायमंड पब्लिकेशन्सचे श्री.पाष्टे यांनी केल्यानेच हे ग्रंथरूप आकाराला आले.
प्रत्यक्ष ग्रंथाचे लेखन करताना अनेक अभ्यासकांशी अभ्यासपूर्ण चर्चा घडून आली. त्यामुळे लिखाणातील त्रुटी लक्षात येऊ शकल्या. आदरणीय प्राचार्य देवगिरी महाविद्यालय श्री. जवदे, डॉ. उत्तम भोईटे, डॉ. प्रल्हाद जोगदंड, डॉ. पदमाकर सहारे, डॉ. राहुल हजारे, प्रा. जगन्नाथ कराडे, डॉ. अरुण चव्हाण इ. ची नावे प्राधान्यक्रमाने घेता येतील.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Reviews
There are no reviews yet.