Jilha Nyayalaya Bharti Kanisht Lipik Hand Book
नवीन अभ्यासक्रमानुसार जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपिक HandBook
■ भारताची न्यायव्यवस्था + GK-सामान्य ज्ञान + अभ्यास प्रश्नसंच -MCQs
■ ‘भारताची न्यायव्यवस्था’ विशेष माहिती ■ इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य,
व्याकरण व चालू घडामोडी आणि संगणक ज्ञान या विषयांच्या स्मार्ट तयारीसाठी चार्टस् आणि पॉइंटस् सह
■ प्रत्येकी ४० प्रश्नांचे १२ अभ्यास प्रश्नसंच उत्तरांसह विनायक घायाळ
बऱ्याच प्रतीक्षेनंतर जिल्हा न्यायालयाच्या आस्थापने- वरील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई / हमाल या पदांच्या भरतीसाठीची जाहिरात आली आणि तत्संबंधीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. प्रथमतः आपण या पदासाठीचा अर्ज काळजीपूर्वक सादर करणे आवश्यक आहे.
कनिष्ठ लिपिक पदासाठी ४० गुणांची बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या इंग्रजी व मराठी भाषेतील ४० प्रश्नांचा समावेश असणारी प्रश्नपत्रिका असणार आहे. या परीक्षेसाठी इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण, चालू घडामोडी आणि संगणक ज्ञान असा सामान्य ज्ञानावरील अभ्यासक्रम आहे. या विषय घटकांचा आवाका मोठा आहे आणि उपलब्ध असलेला वेळ मात्र अपुरा आहे, तेव्हा या मर्यादित आणि महत्त्वाच्या कालावधीत आपली तयारी अचूक दिशेने व्हावी याच हेतूने विनायक घायाळ यांच्या प्रथितयश लेखणीतून साकारलेले ‘जिल्हा न्यायालय भरती – कनिष्ठ लिपिक हँड बुक’ हे पुस्तक आपल्या हाती सोपवीत आहे.
या पुस्तकात पहिल्या विभागात ‘भारताची न्याय- व्यवस्था’ यावर एक विशेष प्रकरण देण्यात आले आहे. यामध्ये देशातील न्यायव्यवस्थेची वैशिष्ट्ये, सर्वोच्च व उच्च न्यायालय आणि दुय्यम न्यायालय यांच्या संबंधी विस्तृत
परंतु मुद्देसूद माहिती दिलेली आहे. दुसऱ्या विभागात सामान्यज्ञान (GK) आणि चालू घडामोडींचा यथायोग्य परामर्श चार्टस् व पॉइंटस्च्या स्वरूपात घेतलेला आहे.
तिसऱ्या विभागात प्रत्येकी ४० प्रश्नांचा समावेश असणारे १२ प्रश्नसंच दिले आहेत. यामधील प्रश्न नवीन अभ्यासक्रम व पॅटर्नवर आधारित आहेत.
अधिक अभ्यासासाठी आपण प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी जिल्हा न्यायालय (के’ सागर), स्मॉलेस्ट जनरल नॉलेज (विनायक घायाळ), संपूर्ण मराठी (के’सागर), संपूर्ण इंग्रजी (के’ सागर), ही पुस्तके अभ्यासावीत.
या परीक्षेच्या तयारीसाठी आणि त्यातील देदीप्यमान अशा यशासाठी आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
BEST OF LUCK!!!
K’Sagar PUBLICATIONS
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065
Reviews
There are no reviews yet.