K’Sagar Sampurn Talathi TCS IBPS Pattern के’सागर संपूर्ण तलाठी
के सागरीय…
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व सरकारी खात्यांमध्ये तृतीय श्रेणीतील हजारो पदांची एकत्रित वा टप्प्याटप्प्याने भरती करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन आहे. या पदांसाठी यापूर्वी विहित केलेल्या अभ्यासक्रमाचा विचार करता मराठी शब्दसंग्रह व व्याकरण, इंग्रजी शब्दसंग्रह व व्याकरण, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी, सामान्यज्ञान आणि त्या त्या पदांनुसार विषयाचे ज्ञान – अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम या पदभरतीसाठी विहित केला जाणे अपेक्षित आहे.
आगामी काळात, सन २०२३ मध्येच राज्यसेवेतील तृतीय श्रेणीची पदे किमान त्यातील महत्त्वाची पदे तरी भरली जाणे अंदाजित आहे. या पदांची जाहीरात आल्यावर अभ्यास सुरू करणे म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणणे होय.
तलाठी व संवर्गीय पदे ही तृतीय श्रेणीतील महत्त्वाची पदे होत. तलाठी हा तर ग्रामीण भागातील मुलकी व महसूल प्रशासनाचा कणाच मानावा लागेल. या पदाचे विशिष्ट महत्त्व लक्षात घेता तलाठी व संवर्गीय पदांवर निवड करण्यासाठी जिल्हा स्तरावर घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी या स्वतंत्र व सर्वसमावेशक पुस्तकाचा प्रपंच उभा केला आहे.
लेखकाने उपरोक्त अभ्यासक्रम व वेगवेगळ्या विषयांना दिले जाणारे कमी-अधिक महत्त्व यांचा एकत्रित व साकल्याने विचार करून स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील आपल्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ लेखनानुभवातून प्रस्तुतच्या ‘तलाठी परीक्षा – संपूर्ण मार्गदर्शका’ची रचना साकारली आहे.
या परीक्षेसाठी आपला एक ‘आदर्श’ व ‘विश्वासू मित्र’ ठरण्याचे भाग्य या संपूर्ण मार्गदर्शका’स लाभेल आणि आपल्या आगामी परीक्षेत आपणास सुयश मिळवून देण्यासाठी हा संपूर्ण मार्गदर्शक आपल्या विश्वासू मित्राची भूमिका प्रामाणिकपणे व जबाबदारीने पार पाडील, असा सार्थ विश्वास वाटतो.
या सार्थ विश्वासासह आणि शुभेच्छांसह प्रस्तुतचा संदर्भग्रंथ आज आपल्या हाती सोपवीत आहे.
आपला,
व्ही. एस. क्षीरसागर (K’Sagar)
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.