TET Paper Pahia va Paper Dusra Sampurn Margdarshan IBPS Special Ksagar TET पेपर पहिला व पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक
के’सागरीय…
गेल्या काही वर्षांपासून राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा प्राथमिक स्तर म्हणजे इयत्ता पहिली ते पाचवी या वर्षांसाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी व उच्च प्राथमिक स्तर म्हणजे इयत्ता सहावी ते आठवीसाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी अशा एकूण दोन स्तरांवर घेतली जाणार आहे.
प्राथमिक स्तरासाठी- (१) बालमानस- शास्त्र व अध्यापनशास्त्र (२) भाषा पहिली (३) भाषा दुसरी (४) गणित आणि (५) परिसर अभ्यास अशा पाच घटकांतर्गत तर-
उच्च प्राथमिक स्तरासाठी- (१) बाल- मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (२) भाषा पहिली (३) भाषा दुसरी (४) गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्रे या चार घटकांतर्गत विहित करण्यात आलेला पाठ्यक्रम अतिशय व्यापक व विस्तृत कक्षा असणारा आहे.
या दोन्ही स्तरांवरील अभ्यासक्रमाचा एकत्रित, साकल्याने व आगामी परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करून प्रस्तुतच्या संदर्भाची रचना साकारली आहे. या दोन्ही परीक्षांचा व्यापक अभ्यासक्रम लक्षात घेऊन एकात्मिक व सर्व समावेशक दृष्टिकोनातून पुस्तकाची रचना एकूण आठ विभागांत उपविषयनिहाय
करण्यात आली आहे. प्रत्येक उपविषयास आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून असलेले महत्त्व व त्या त्या उपविषयाची व्याप्ती लक्षात घेऊन प्रत्येक विभागात संबंधित उपविषयां- तर्गत आवश्यक तितकी प्रकरणे दिली आहेत. संपूर्ण पुस्तक वस्तुनिष्ठ चार पर्यायी प्रश्नांच्या स्वरूपात असल्याने ते निश्चितच अधिक परीक्षाभिमुख बनले आहे.
आपल्या अभ्यासक्रमात बालमानस- शास्त्र व अध्यापन पद्धती यांना दिलेले महत्त्व लक्षात घेऊन या उपविषयावरही विशेषत्वाने भरपूर व सर्वसमावेशक प्रश्न दिले आहेत. साधी-सोपी के सागरीय भाषाशैली याही संदर्भात अगत्याने जपली आहे.
हा संदर्भ साकारताना पूर्वप्रकाशित डी. एड. अभ्यासक्रम (प्रा. महाळंक), संपूर्ण शिक्षणशास्त्र (के’सागर) व इतर के’ सागरीय ग्रंथांचा संदर्भ घेतला असल्याने या संदर्भाचा निर्देश येथे करणे मी अगत्याचे मानतो.
विद्यार्थी मित्रांच्या विश्वासास पात्र ठरलेला आणि आपली उपयुक्तता व विद्यार्थि- प्रियता सिद्ध करणाऱ्या के’ सागरीय लेखणीतून उतरलेला हा आगळावेगळा संदर्भही विद्यार्थि- मित्रांना यशोमंदिराकडे घेऊन जाणाऱ्या वाटा उजळील, यात शंकाच नाही.
आपला,
व्ही. एस. क्षीरसागर (K’Sagar)
Available at Ksagar Book Centre
www. ksagaronline.com or call on 9545567862 /20224453065
Reviews
There are no reviews yet.