Arogya Vibhag Tantrik Dayari TCS IBPS Pattern विजयपथ आरोग्य विभाग तांत्रिक डायरी
लेखक : विकास सिंदाळकर
चौथ्या आवृत्तीच्या निमित्ताने…
सर्वप्रथम तुम्हा सर्व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष आभार मानतो कारण तुम्ही देत असलेल्या पाठिल्यामुळेच व माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच ही चौथी आवृत्ती तुमच्यापर्यंत येणे. शक्य झाले. आरोग्यविभाग परीक्षेत यश मिळवायचे असेल तर तांत्रिक प्रश्नांमध्ये 80 गुणांपैकी जास्तीत जास्त गुण घेणे गरजेचे आहे. किंबहना 78 ते 80 गुण मिळालेच पाहिजे हा ध्यास मनी बाळगा. आता एवढे गुण कसे मिळवायचे हा तुमचा प्रश्न असेल. बाच प्रश्नाचे उत्तर म्हणजे ‘आरोग्य विभाग तांत्रिक डायरी होय. 2019, 2020 आणि 2021 या तीन वर्षी झालेल्या आरोग्य विभागामधील परीक्षेत या पुस्तकातून पैकीच्या पैकी प्रश्न प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या आलेले आहेत. परीक्षेत यश मिळवायचे असेल तर योग्य पुस्तकांचा वापर अनिवार्य ठरतो आणि आरोग्य विभागातील तांत्रिक प्रश्नासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम व एकमेव पर्याय म्हणजे ‘आरोग्य विभाग तांत्रिक डायरी’ होय.
आरोग्य विभाग परीक्षेत प्रश्नांची सातत्याने पुनरावृत्ती होते. याचा विचार करून प्रत्येक प्रकरणानंतर 2011 ते 2021 दरम्यान झालेले आरोग्य विभाग परीक्षेतील तांत्रिक प्रश्न सरावासाठी घटकनिहाय उपलब्ध करून दिलेले आहे. या पुस्तकांची वैशिष्ट्य म्हणजे परीक्षाभिमुख रचना, साधी व सोपी भाषा, मागील प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास करून सर्व घटक व उपघटकांचा समावेश केलेला आहे. प्रत्येक घटक हे चालूघडामोडी नुसार UPDATED असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव पुस्तक आहे. प्रत्येक परीक्षेत आरोग्याशी निगडीत चालूघडामोडीवर आधारित किमान पाच प्रश्न येतात आणि याचा विचार करून 2021 व 2022 या दोन वर्षांचे आरोग्य चालूघडामोडीचा समावेश या पुस्तकात केलेला आहे.
मी स्वतः एक स्पर्धा परीक्षा अभ्यासार्थी असल्यामुळे विद्यार्थ्यांना अचूक व योग्य परीक्षाभिमुख पुस्तक देण्याचा मी पुरेपुर प्रयत्न केलेला आहे. सदर पुस्तकाचे परीक्षेपूर्वी किमान चार ते पाच वेळेस समजपूर्वक वाचन होणे आवश्यक आहे. सदर पुस्तक परिपूर्ण होण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी वेळोवेळी सूचना दिल्या. त्याचप्रमाणे श्री. सचिनकुरूंद सर यांचे अचूक नियोजन व माझी पत्नी सौ. वर्षा सिंदाळकर, माझे सहकारी मेघदूत हेर्लेकर यांच्या
प्रयत्नामुळे हे पुस्तक तुमच्या पर्यंत ठरलेल्या वेळेत येण्यास मदत झाली. माझ्या या यशात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष साथ देणाऱ्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. प्रस्तुत पुस्तक तुम्हाला यश प्राप्तीसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल यात मला कसलीही शंका नाही. तुम्हा सर्वांना यशप्राप्तीसाठी करोडो करोडो शुभेच्छा
आपलाच सहकारी
श्री. विकास विलास सिंदाळकर
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Reviews
There are no reviews yet.