Dnyandeep Police Bharti Thokla – ज्ञानदीप पोलीस भरती ठोकळा – परिपूर्ण मार्गदर्शक (2 री आवृत्ती)
लेखक : जितेंद्र पुंडेकर
मनोगत
सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना सप्रेम नमस्कार !!!
पोलीस भरती परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या, आपल्या सर्वांचे मनस्वी अभिनंदन, ज्ञानदीप परिवाराच्या अखंड पुस्तक मालिकेमध्ये ‘पोलीस भरती ठोकळा’ हे पुस्तक आपल्या हाती देताना आम्हांला मनस्वी आनंद होत आहे. पोलीस भरती प्रक्रियेची तरुणांना असलेली आवड लक्षात घेता जास्त प्रमाणात तरुण या परीक्षेची तयारी करतांना दिसतात. या परीक्षेसाठी शारिरीक चाचणी व लेखी परीक्षा असे दोन टप्पे असतात. सर्वसाधारणपणे मुलांना शारिरीक चाचणीत चांगले गुण मिळतात, परंतु लेखी परीक्षेत जास्त गुण मिळत नाहीत.
विद्याथ्र्यांना लेखी परीक्षेची तयारी करतांना मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून हे पुस्तक तुमच्यासाठी सादर करत आहोत आणि अशी आशा करतो की, हे पुस्तक तुम्हाला योग्य मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकामध्ये घटक, उपघटकांनुसार माहितीची मांडणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना कोणत्या विषयाला तसेच कोणत्या घटकाला जास्त महत्त्व आहे हे नक्की समजेल व त्याप्रमाणे अभ्यास करता येईल.
लेखी परीक्षेचा अभ्यास करताना हे पुस्तक विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शक ठरेल. असा आम्हाला विश्वास वाटतो. या पुस्तकासाठी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे ज्ञानदीपचे संचालक श्री. महेश राजाराम शिंदे सर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच ज्ञानदीपचे ‘व्यवस्थापकीय संचालक श्री. उमेश राजाराम शिंदे सरांच्या सहकार्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर पुस्तक वितरणात ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे श्री. नितेश राजाराम शिंदे सर यांचेही आभर मानतो..
तसेच लिखाणांना पुस्तकरूपाने आपल्यास समोर आणणाऱ्या ज्ञानदीप डीटीपी टीमचे देखील
मनापासून आभार व्यक्त करतो. स्वप्नपुर्तीसाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना आगामी परीक्षेसाठी लक्ष शुभेच्छा!!!
आपलाच
जितेंद्र पुंडेकर
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.