Pichakari ( पिचकारी) by-Deepak Gaikwad
लेखक : दिपक गायकवाड
१२८ पानं । २०० रुपय
पिचकारी ही या कादंबरीची नायिका आहे तर माझ्याकडेही रंगपंचमी खेळण्यासाठी पिचकारी हवी अशी इच्छा बाळगणारा बारा वर्षाचा गण्या नायक. पिचकारी मिळवण्यासाठी गण्याचे सर्व मित्र आपल्या आईवडिलांकडे हट्ट करत होते पण गण्याला असा हट्ट करण्याची बिलकुल गरज नव्हती कारण त्याच्याकडे पिचकारीसाठी लागणारे पैसे होते. तेही स्वतः कमावलेले. आणि जरी ते नसते तरी त्याचे आई वडील हो-नाही करत त्याचा हा हट्ट सहन पुरवनायातले होतेच. पण गण्या ज्या क्षणापासून पिचकारी मिळवण्याची इच्छा व्यक्त करतो त्या क्षणापासून त्याचे आयुष्य छोटी छोटी वळणे घेऊ लागते. त्या वळणांवरून पिचकारीचा पाठलाग करता करता ती पिचकारी गण्याला, त्याच्या कुटुंबाला आणि एकंदरीत त्याच्या संपूर्ण गावालाच एका विचित्र परिस्थितीत नेऊन सोडते. हे जीवन नक्की कसं जगलं पाहिजे हे सांगणारी एक ज्वलंत वास्तववादी, उत्कंठावर्धक, डोळ्यात अंजन घालणारी कादंबरी.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.