Just Keep Buying – Guntavanukiche Manasshastra
गुंतवणुकीचे मानसशास्त्र
लेखक :निक मॅग्युली
अनुवादक : वीरेंद्र ताटके
“प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गुंतवणुकीसाठी प्रत्यक्ष उपयोगी पडतील असे विचार या पुस्तकात मांडले आहेत. लेखकाने त्याचं मत खूप अभ्यास करून आकडेवारीसहित सादर केले आहे, शिवाय ते खूप साध्या सोप्या शब्दांत मांडले आहे. त्यामुळे ते वाचकाला मनापासून पटतं.’ “>
“हे पुस्तक वाचलं की लेखक निक हा अतिशय बुद्धिमान मनुष्य आहे हे मनोमन पटतं. पुस्तकात गुंतवणुकीविषयीची शास्त्रोक्त माहिती प्रत्येक गुंतवणूकदारासाठी उपयोगी आहे. म्हणूनच प्रत्येक गुंतवणूकदाराने हे पुस्तक वाचलंच पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे.’
(पैशाचे मानसशास्त्र या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक)
(ॲटॉमिक हॅबिट्स या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक)
– जेम्स क्लिअर
– मॉर्गन हाउजेल
बचतीचा आणि गुंतवणुकीचा विषय सुरू झाला, की बहुतेकांचा गोंधळ उडतो. नक्की किती आणि कशी बचत करावी, गुंतवणूक नक्की कोठे करावी, यांसारखे प्रश्न त्यांना सतावत असतात. दुर्दैवाने यासंबंधी दिला जाणारा सल्ला हा पूर्वग्रहदूषित आणि जुन्या समजुतींवर आधारित असतो. ‘जस्ट कीप बाईंग’ या पुस्तकात निक मॅग्गीली यांनी दिलेला सल्ला हा पूर्णपणे आकडेवारीवर आधारित शास्त्रोक्त सल्ला आहे. या पुस्तकात दिलेल्या माहितीच्या मदतीने तुम्ही तुमचा स्वतःचा गुंतवणुकीचा आराखडा तयार करू शकता आणि दीर्घकाळात संपत्ती निर्माण करू शकता. हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की आर्थिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी तुम्हाला वाटते तेवढी बचत करण्याची गरज नसते. शिवाय प्रत्येक वेळी गुंतवणुकीसाठी शेअर बाज़ार पडण्याची वाट बघायची आवश्यकता नसते. बाजार कोसळल्यानंतर आपण त्यातून तरून कसे जायचे हेदेखील तुम्हाला या पुस्तकाच्या वाचनाने लक्षात येईल.
या पुस्तकाच्या वाचनानंतर तुम्ही गुंतवणुकीसाठी अधिक सजग व्हाल, अधिक स्मार्ट व्हाल आणि श्रीमंत होण्याचा तुमचा मार्ग अधिक सोपा होईल. म्हणूनच तुमच्या आर्थिक नियोजनातील पुढची थायरी म्हणजे ‘गुंतवणुकीचे मानसशास्त्र’ हे पुस्तक वाचणे.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Reviews
There are no reviews yet.