Vaidyakacha Bajar Ani Tyatun Sutkecha Marg
वैद्यकाचा बाजार.. आणि त्यातून सुटकेचा मार्ग
डॉक्टर या घटकाचा विचार केला तर गेली दोन दशके कोणाही डॉक्टरच्या मनात एक विचार प्राधान्याने येत असतो. माझ्या वर्गात, माझ्या बॅचमध्ये, माझ्या गावात माझा क्रमांक कायमच पहिल्या दहांत राहिला आहे. (त्याशिवाय तो डॉक्टर होऊच शकत नाही.) पण माझा मित्र वयाच्या एकविसाव्या वर्षी इंजिनियर होऊन आयटीमध्ये वीस हजार कमावू लागला. दुसरा कॉमर्सवाला एम.बी.ए. करून वीस हजारच कमावतो आहे, आणि मी मात्र वयाच्या एकोणतिसाव्या वर्षीदेखील एखाद्या मोठ्या रुग्णालयातील किमान पंधरा हजारांची नोकरी करू शकत नाही किंवा स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्याकरता निव्वळ जागेसाठी दहा लाख रुपये घालू शकत नाही.
अर्थातच हा झाला स्वतःकडे पाहण्याचा अगदी रास्त विचार. याचाच पुढचा टप्पा म्हणजे ‘मला महिन्याला किमान लाखभर रुपये तरी मिळणे आवश्यक आहे हा विचार. यातही फारसे काही वावगे नाही. पण इथेच गफलत सुरू होते. शंभर फॅमिली फिजिशियन, शंभर स्पेशालिस्ट किंवा शंभर सुपर स्पेशालिस्टपैकी वयाच्या पस्तिशीत सहजगत्या महिना दोन-तीन लाख रुपये मिळवणारे किती असतात? थोडक्यात, तिसाव्या वर्षी प्रॅक्टिसला सुरुवात केल्यावर पाच वर्षांत हा आकडा गाठणाऱ्यांची संख्या जर जाणून घेतली तर या अपेक्षांची दुसरी बाजू समोर येऊ लागते. राज्य सरकार वा केंद्र सरकारच्या नोकरीत गेलेले किंवा प्राध्यापक बनलेले काही हजार डॉक्टर जेमतेम पस्तीस ते पन्नास हजार रुपयांवर नोकरी करत असतात, ही आहे वस्तुस्थिती.
भारत सरकारच्या वैद्यक सेवेत किंवा संरक्षण दलांच्या वैद्यक विभागात केरळ, तामिळनाडू, बंगाल या प्रांतांतील डॉक्टरांची संख्या फार मोठी आहे. या तीनही प्रांतांत खासगी व्यवसायास पडलेल्या मर्यादा व स्थानिक लोकांची आर्थिक कुवत यांचा हा परिणाम असावा. याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य भागातील वैद्यकीय विद्यार्थी डॉक्टर झाल्यावर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय सेवेत थेट नोकरी मिळवणं पसंत करतात. हे प्रमाणही मोठं आहे. ‘अत्यंत बुद्धिमान’ अशा गटातील डॉक्टर या व्यक्तीवर समाजातील जेमतेम उच्च मध्यमवर्गीय जीवन आर्थिकदृष्ट्या लादले जाते. गेल्या पंधरा-वीस वर्षांत ही तफावत प्रत्येक डॉक्टरला प्रकर्षाने जाणवत आहे. याला अपवाद जेमतेम पाच टक्क्यांचा!
(या लेखाचा उर्वरित भाग वाचा पुस्तकामध्ये
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.