Gandhi Nantarcha Bharat : Ramchandra Guha
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा इतिहास
• गांधीनंतरचा भारत’ या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीनंतर दहा वर्षांनी ही वाढवलेली सुधारित आवृत्ती प्रकाशित होत आहे. असंख्य जाती-जमाती, वर्ग, भाषा अणि धर्म यांत विभागलेला. प्रचंड हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करणारा आणि यादवी संपत बुडालेला हिंदुस्थान स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एक एकात्म लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयाला येईल आणि टिकून राहील असे कोणालाही वाटले नव्हते. या वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथात भारताच्या निर्माणाची करुण तसेच संघर्षमय कहाणी त्यातील सर्व गर्हणीय तसेच उदात्त इतिहास क्षणांचा वेध घेत रामचंद्र गुहांनी सांगितली आहे. आधुनिक भारताच्या जडण-घडणीची कथा जितकी उद्विग्न करणारी आहे तितकीच रसपूर्णही आहे. भारतात वेळोवेळी झालेल्या निरनिराळ्या संघर्षाचे वर्णन रामचंद्र गुहांनी अतिशय ओघवत्या भाषेत केले आहे. त्यातून स्वतंत्र भारताच्या घडणीचा अद्ययावत व अर्वाचीन पट आपल्या डोळ्यांसमोर नाट्यमय रीतीने उलगडत जातो. असंख्य संघर्षातूनही भारताला लोकशाहीच्या मार्गाने चालविणाऱ्या प्रक्रियांचा त्यांनी सखोल ऊहापोह केला आहे. भारताचा आधुनिक इतिहास घडविणाऱ्या अगणित व्यक्तिरेखा आहेत. प्रदीर्घ काळ पंतप्रधानपद भूषविणारे पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी आहेत. शेख अब्दुल्लांसारखे बंडखोर राज्यकर्ते आहेत. एम. जी. रामचंद्रन, अंगामी झापू फिझो यांसारखे प्रादेशिक नेते आहेत. जयप्रकाश नारायणसारखे सामजिक कार्यकर्ते आहेत. रामचंद्र गुहा तितक्याच संवेदनशीलतेने सामान्य भारतीय स्त्री-पुरुषांबद्दल लिहितात. रामचंद्र गुहांनी त्यासाठी अथक संशोधन करून नवनिर्मित भारत आपल्यासमोर उभा केला आहे.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Reviews
There are no reviews yet.