Hand Book of Food Safety by- Narayan Sarkate
Hand Book of Food Safety by- Narayan Sarkate Original price was: ₹620.00.Current price is: ₹434.00.
Back to products
COSMOS Carl Sagan
COSMOS Carl Sagan Original price was: ₹450.00.Current price is: ₹360.00.

Ambedkar : Jivan Aani Varsa ( Ambedkar: A Life )

Original price was: ₹300.00.Current price is: ₹240.00.

Author              :               Shashi Tharoor

Translator       :               Avadhut Dongare

Edition             :              2023

ISBN                  :              9788196259150

Language     ‏    :              Marathi

Publisher         ‎ :             Madhushree Publication / मधुश्री पब्लिकेशन

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Category:
Description

Ambedkar : Jivan Aani Varsa ( Ambedkar: A Life )

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव आज सर्वांत

आदरणीय भारतीयांच्या नामावलीत घेतलं जातं आणि देशभरातील त्यांच्या पुतळ्यांची संख्या महात्मा गांधींच्या पुतळ्यांखालोखाल असेल. किंबहुना, आधुनिक काळातील ‘सर्वांत थोर भारतीय’ ठरवण्यासाठी अलीकडे एक मतचाचणी घेण्यात आली, त्यात दोन कोटींहून अधिक मतं नोंदवली गेली आणि त्यात आंबेडकरांना गांधींपेक्षा जास्त मतं मिळाली होती. आज सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आंबेडकरांवर हक्क सांगण्यासाठी चढाओढ सुरू असते. मुख्यत्वे आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे अस्पृश्यतेवर कायद्याने बंदी आली आणि दलित समुदायाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला, त्यामुळे दलित समूहांमध्ये ते एक आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव केला जातो. व्यक्तीच्या अधिकारांची पाठराखण करणाऱ्या व दडपलेल्यांची उन्नती साधू पाहणाऱ्या उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष, अनेकत्ववादी मूल्यांसह भारत आजपर्यंत लोकशाही म्हणून टिकला, त्याचं मुख्य कारण संविधान हे आहे (पण सध्या ही सर्व मूल्यं संकटात अडकली आहेत). ‘डॉ. आंबेडकरांची थोरवी केवळ एकाच उपलब्धींपुरती मर्यादित मानता येत नाही, कारण सर्वच बाबतीत त्यांनी सारखीच असामान्य कामगिरी केली,’ असं शशी थरूर लिहितात. आंबेडकरांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जीवनपट प्रस्तुत

चरित्रात संक्षिप्तपणे, सुबोधपणे, मार्मिकपणे व आदरभावाने उलगडला आहे. दलित म्हणून जन्म घेतलेल्या आंबेडकरांना आलेले मानखंडना करणारे अनुभव, सामाजिक भेदभावामुळे त्यांच्या समोर उभ्या राहिलेल्या अडचणी आणि यांवर मात करून त्यांनी केलेलं कार्य याबद्दल इथे वाचायला मिळतं. अस्पृश्यता बेकायदेशीर ठरवण्यासाठी आंबेडकरांनी विविध संघर्ष कसे केले, त्या काळातील इतर महान राजकीय व वैचारिक व्यक्तिमत्वांशी त्यांचे कोणते वाद झाले, आणि व्यक्तीचे अविभाज्य अधिकार व सामाजिक न्यायाच्या आधुनिक संकल्पना स्वीकारलेलं दूरदर्शी संविधान त्यांनी भारतापुढे कसं मांडलं, याचा उहापोह सदर पुस्तकात आहे. ‘आंबेडकरांनी भविष्यातील लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवलं, स्वतःच्या बुद्धिमत्तेचं बळ व लेखणीची ताकद यांद्वारे त्यांनी एका प्राचीन सभ्यतेला आधुनिक युगामध्ये आणून ठेवलं,’ असं थरूर लिहितात

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.