Isak Bagwan – इसाक बागवान
काही जणांच्या नावातच शौर्य हा शब्द दडलेला असतो. मुंबई पोलीस इतिहासातील असेच एक नाव म्हणजे इसाक बागवान,
एका बेधडक पोलीस अधिकाऱ्याचे मुंबई गुन्हेगारी जगातील ‘बेमिसाल’ अनुभव हे पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील विशेषण खऱ्या अर्थाने या पुस्तकाला शोभून दिसते. एखाद्या चित्रपटाची सुरुवात जशी फ्लॅशबॅकने होते तशी या पुस्तकाची सुरुवात आहे. पोलीस दलात भरती होणाच्या प्रेरणेतून ते पोलीस खात्यातील शेवटच्या दिवसापर्यंतचा बागवान यांचा हा प्रवास कमालीचा थक्क करून सोडतो. पुस्तकातील प्रत्येक प्रकरण हे वाचनीय आहेच परंतु पुढे काय घडणार याची उत्सुकता ताणून धरते. या पुस्तकातील प्रकरणात बागवानांनी हॅन्डल केलेल्या केसेस या मुळात सत्य असल्याने त्या पोलीस दलाला एक विशिष्ठ उंचीवर नेऊन ठेवतात. गुन्हेगारी जगताचा खऱ्या अर्थाने ‘एन्सायक्लोपीडिया असे या पुस्तकाचे थोडक्यात वर्णन करता येईल. हे पुस्तक पोलीस खात्याचा ‘दस्तावेज’ असल्याने चोखंदळ वाचकांप्रमाणे खात्यातील सगळ्यांच्या संग्रही असावे व नविन प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हे मार्गदर्शक ठरू शकते असे माझे मत आहे.
श्री. विश्वास नांगरे पाटील
विशेष पोलीस महानिरीक्षक
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.