Ghatsutra Deepak Karanjikar घातसूत्र दीपक करंजीकर
टायटॅनिक जहाज बुडाले की बुडवले? म्हणजे तो एक अपघात होता की घातपात? १९१२ साली झालेल्या अपघात (की घातपात) ते १९१६ साली अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रंप विराजमान होणे, या शतकभराच्या कालखंडात जागतिक पातळीवर घडलेल्या महत्त्वाच्या घटनांमागील पाताळयंत्र शोधण्याचा प्रयत्न ‘घातसूत्र’ या कादंबरीत करण्यात आला आहे. आपण जे जगतो आहोत ते स्वतंत्रपणे जगत आहोत की कुणीतरी आपल्याला बुद्धिबळाच्या पटावरील सोंगट्यांप्राणे मागे-पुढे जायला लावत आहे, असा विचार करायला लावणारे वेगवान शैलीत लिहिलेले अप्रतिम पुस्तक आहे.
हे पुस्तक कदाचित जगातलं पहिलं असं पुस्तक आहे की ज्यात सर्वप्रकारच्या आंतरराष्ट्री य घटनांचा
पडद्यामागल्या हलचालींचा लीं मागोवा घेणात आला आहे आणि तो अतिशय तार्किक पद्धतीने त्यातले बारकावे
वाचकांसमोर मांडायचा एक वस्तुनिष्ठ प्रयत्न मी केलाय आणि हे सगळं संदर्भासहीत लिहिलेले आहे या
पुस्तकांसाठी मी तब्बल 481 पुस्तके वाचली आणि त्यातल्या ज्यांचा प्रत्यक्ष संदर्भ येतो अशा 150
पुस्तकांची यादी परिशिष्टात दिलेली आहे.
जागतिक माध्यमांनी मेनस्ट्री म बातम्यांच्या नावाखाली जी काही पसरवलेली आहे ती किती मायावी आहे
याची सतत बोचणारी जाणीव मला होत असे.
ज्यांना आजची आपली आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थिती सतत कशी बदलत आहे.. त्या जागतिक
धोरणे व ती धोरणे राबविणारी त्यामागाच्या अदृश्य शक्ती कोणत्या आहेत हे जाणून घ्यायचे आहे त्यांनी हे
जरूर वाचावे. कारण या सगळ्याचा . त्यांचा आपल्या रोजच्या जगण्याशी अत्यंत निकटचा असा संबंध
आहे.
कदाचित हे वाचताना, व्यक्ती म्हणून आपण किती नगण्य आहोत ही जाणीव होऊ शकते. लोकाशाही,
व्यक्तिस्वातंत्र्य आणि आर्थिक सुबत्ता ह्य सगळ्या गोष्टींना कस राबविले जाते याचा नवीन दृष्टिकोन
मिळण्याचीही शक्यता आहे..
घातसूत्न : दीपक करंजीकर
ग्रंथाली (मुंबई) प्रकाशन
Available at Ksagar Book Centre
www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.