Dear Tukoba ( डियर तुकोबा )
लेखक : विनायक होगाडे
तुकारामायण’, ‘मीडिया ट्रायल ऑन तुकोबा’ आणि ‘डियर तुकोबा’ अशा तीन रुपात विनायक होगाडे यांनी त्यांना झालेले तुकारामदर्शन आपल्यापर्यंत पोहोचविलेले आहे. ते अत्यंत प्रभावी आणि गुंतवून टाकणारे तर आहेच, खेरीज ते आपल्या मनात विचारांचे हिंदोळ-कल्लोळ मातविणारे आहे. चारशेंवर वर्षांआधी तुकोबांनी आपल्यात पेरलेली सांस्कृतिक जनुके आजही आपल्यात वाहती असल्याने तुकोबा समकालीनच आहेत, हे ढळढळीत सत्य होय. म्हणून होगाडे यांनी काळाची काही मोडतोड, खेचाखेच केली आहे असे अजिबातही वाटत नाही. आज ज्या प्रकारच्या राजकीय, सामाजिक आणि मानसिक स्थितीत एक समूह म्हणून आपण जगत आहोत, त्या वर्तमानात तुकोबांची अशी आठवण होणे, करणे आवश्यकच आहे, हे होगाडे यांनी फार प्रत्ययकारी प्रकारे केले आहे. आधीच्या कविता आणि अखेरीचे स्फुट यांच्या बळावर ही ‘ट्रायल’ फार सामर्थ्याने उभी करून होगाडे यांनी फार वेधक आणि महत्वाचे सांस्कृतिक जागरण मांडले आहे. या जागरणाचा एक श्रोता म्हणून मी अंतःकरणापासून त्यांचे अभिनंदन व स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. – रंगनाथ पठारे प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.