SET NET Vastunishtha Itihas Paper-2 सेट/नेट वस्तुनिष्ठ इतिहास पेपर-२
मनोगत
इतिहास विषयातून सेट/नेटची परीक्षा देणान्या विद्यार्थ्याकडे समग्र अभ्यासक्रमावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांचा उत्तरासह संग्रह असणे आवश्यक असते, याची जाणीव मी स्वतः या परीक्षांची तयारी करीत असताना मला सतत व्हायची. त्यातूनच सेट/नेट इतिहास पेपर क्र. २ साठी परीक्षार्थी विद्याथ्यांना मार्गदर्शक व सहाय्यक व्हावा या उद्देशाने प्रस्तुत वस्तुनिष्ठ ग्रंथ निर्मितीचा प्रयत्न केला आहे. साधारणतः या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतून विचारले जाणारे प्रश्न हे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना विषय कळला आहे का, त्याचे विषयज्ञान विषयाचा पायाभूत अभ्यास तपासणारे असतात. वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या माध्यमातून केवळ स्मरणशक्तिशिवाय विषयातील संज्ञा, संकल्पनांचा परीक्षार्थी स्वतंत्रपणे विचार करू शकतो का, त्यातून अचूक उत्तरापर्यंत पोहचू शकतो का हेही यात पाहिले जाते. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षांमध्ये आव्हानात्मक प्रश्नांची संख्या प्रश्नपत्रिकेत मोठ्या प्रमाणात वाढते आहे. सेट, नेटच्या परीक्षांमध्ये साधारणतः प्रश्नात्मक, रिकाम्या जागा, जोड्या जुळवून योग्य उत्तर निवडा, प्रतिपादन आणि कारण या आधारे उत्तर निवडा, या सोबतच विधानात्मक (एखादे विधान मत देऊन त्यावर आधारित उत्तर ओळखणे), एकापेक्षा जास्त उत्तरे असणारे प्रश्न व उताऱ्यावर आधारित प्रश्न अशा वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश प्रश्नपत्रिकेत असतो.
सेट / नेटच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप लक्षात घेऊनच अभ्यासक्रम व अभ्यासक्रमातील घटकनिहाय वस्तुनिष्ठ प्रश्न यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. संकल्पना व संकल्पनाधारित प्रश्न, प्राचीन भारत व पूर्व मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर आधारित एकूण तीन प्रकरणे, मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर आधारित तीन प्रकरणे आणि आधुनिक भारताच्या इतिहासावर आधारित एकूण तीन प्रकरणे अशी भारतीय इतिहासावरील एकूण नऊ प्रकरणे आणि इतिहासलेखनशास्त्र यावर एक प्रकरण त्याचबरोबर अतिरिक्त अभ्यासासाठी आधुनिक जगाच्या इतिहासावरील एक प्रकरण अशा एकूण अकरा प्रकरणांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. अभ्यासाच्या सोयीसाठी प्रत्येक प्रकरणातील उपघटकांनुसार प्रकरणात उपविभाग तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक घटकावर लक्षपूर्वक प्रश्न समाविष्ट करणे शक्य झाले. बहुपर्यायी प्रश्न तयार करत असताना खरे आव्हान असते ते अचूक उत्तरासोबत चुकीची उत्तरे पर्याय म्हणून देण्याचे ! प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांप्रमाणे हे आव्हान पेलण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. यासोबतच मागील काही प्रश्नपत्रिकेतील प्रश्नही त्या-त्या प्रकरणांमध्ये, उपघटकांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या प्रश्नांप्रमाणे नव्या प्रश्नांचा समावेश करणे सहज शक्य झाले.
-होईल आणि पुढील आवृत्तीत त्यात सुधारणा करण्यास मदतच होईल.
सर्व विद्यार्थिमित्रांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा !
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.