Back to products
Aadhunik Maharashtracha Itihas aani Samajsudharak Vitthal Pungale
Aadhunik Maharashtracha Itihas aani Samajsudharak Vitthal Pungale Original price was: ₹300.00.Current price is: ₹210.00.

Prachin va Madhyayugin Bharatacha Itihaas Vitthal Pungale प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास

Original price was: ₹220.00.Current price is: ₹165.00.

Author        : Vitthal Pungale / विठ्ठल पुंगळे 

Edition         : 2 nd- 2020

Language  ‏  : Marathi

Publisher     : Vedika Publication वेदिका पब्लिकेशन

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Prachin va Madhyayugin Bharatacha Itihaas Vitthal Pungale प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास

लेखक : विठ्ठल पुंगळे  प्रकाशन : वेदिका पब्लिकेशन

दोन शब्द…

मित्रांनो

भरत स्वप्नांच्या तुकडयांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन कोमल भुतकाळाच्या साखळदंडाने करकचून बांधून ठेवताही येत नाही, त्याला भविष्याच्या गरुडत्वाचे वरदानही लाभले आहे. एखादे स्वप्न पाहणं, ते फुलविणे, ते सत्यसृष्टीत उतरावे म्हणून धडपडणे, त्या धडपडीचा आनंद लुटणे आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावले तरी त्याच्या तुकड्यावरुन रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावणे हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळे या वि. स. खांडेकरांनी वर्णन केल्याप्रमाणे प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करतांना भारताचे राजकारण, समाजकारण, धर्म व संस्कृती यात झालेले बदल

सकारात्मक व नकारात्मक दोन्ही बाजूने दिसतील त्या बदलातूनच मानवी जीवनाला, संस्कृतीला एकमेव निश्चीत मार्ग मिळालेला आहे. प्राचीन भारताच्या वाटचालीत देशातील प्राकृतिक व ऐतिहासीक परिस्थीतीचे मोठे योगदान राहिलेले आहे. हिमालयाचे अभेद्य संरक्षण, सुपीक जमिन पाऊस व वारा यातून प्राचीन भारतातील मानवाला जीवन संघर्षात एक प्रकारची स्थिरता प्राप्त झाली. सुपीक प्रदेशात मानव टोळ्या करून राहू लागला, शेतीची कला शिकला. धर्म संस्कृती व विवीध धार्मिक रचनांनी त्यांच्या जीवनास एक धार्मिक व आध्यात्मिक अधिष्ठाण प्राप्त करुन दिले. जीवन संघर्षाचा

मूळ हेतू केवळ जगणे, ऊपभोग घेणे नसून मानवा मानवातील प्रेम, सहिष्णूता, एकमेकांच्या विचारांचा, धर्माचा आदर

राखणे या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत याची जाणीव होते. प्राचीन काळातील महाजनपदे, गणराज्ये, प्रादेशिक राज्ये यातील राजांनी घडवून आणलेल्या सुधारणांना आणखी खूप महत्त्व आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. कोणत्याही देशाच्या विकासात केवळ साम्राज्यवाद, आर्थिक होत महत्त्वाचे नसते तर जीवनाची व समाज जीवनाची जी विविध क्षेत्रे असतात जसे शिल्पकला, चित्रकला, संस्कती, साहित्य यातील यालाही तितकेच महत्त्व आहे. प्राचीन काळापासून भारतावर अनेक परकिय आक्रमकांनी आक्रमणे केलेली आहे. त्यातूनच सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढली. प्राश्चात्य संस्कृतीच्या प्रकाशात भारतीय संस्कृतीची अनुकूल-प्रतिकूल बाजू पाहता आली. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव भारतीय संस्कृतीतील समाज, धर्म, कला, साहित्य इ. वर पडला; त्यातून भारतीय संस्कृती प्रगल्भ बनली. एखाद्याला प्रशासकीय अधिकारी होताना त्याला भारताच्या प्राचीन संस्कृतीबद्दल माहिती असावी हा शुद्ध हेतू समोर ठेऊन आयोगाने अभ्यासक्रम तयार केलेला आहे.

प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास हे पुस्तक आपल्या हाती देतांना मला अत्यानंद होत आहे. मानवाची प्रगती अधोगती यातील सिमारेषा या विषयाच्या अध्ययनातून स्पष्ट होतील. मानवाची प्रगती अधोगती समजण्याचे जी काही उद्दिष्ट्ये मानवाने ठरविलेली आहे तो समजण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या विषयांचा विश्लेषणात्मक अभ्यास होय. राज्यसेवा व युपीएससी च्या पूर्व परिक्षेत प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास या विषयावर ५-७ प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांचे महत्व लक्षात घेता व विद्यार्थ्याच्या अध्ययनातील अडचणी पाहता हा विषय सोपा करणे तसेच सुटसुटीतपणा आणणे हे ध्येय समोर ठेवून पुस्तकाची रचना केलेली आहे. विद्यार्थी मित्रांना हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल यात तिळमात्र शंका नाही.

या पुस्तकात हा विषय खुप साध्या-सोप्या भाषेत आणि रोचक पद्धतीने मांडलेला आहे. प्रत्येक प्रकरणाची वैज्ञानिक दृष्टीकोणातून मांडणी केलेली आहे. जेणेकरून विविध शाखांच्या विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा फायदा व्हावा. विषयाला उपयुक्त बनविण्यासाठी अनेक विद्वानांच्या ग्रंथाचा उपयोग केला आहे. त्याची यादी शेवटी दिलेली आहे. विद्यार्थ्यांना विषय ज्ञान होण्यासाठी या पुस्तकाची मदतच होईल. शेवटी या पुस्तकाचे मुल्याकन शिक्षकवृंद व विद्यार्थ्यावर सोडतो.

वैदिका पक्सिकेशन, औरंगाबाद

विठ्ठल पुंगळे

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.