Vyavsayik Samajkarya व्यावसायिक समाजकार्य
डॉ. प्राजक्ता टांकसाळे
दोन शब्द …
समाजकार्य शिक्षण आणि हे शिक्षण घेणाऱ्या संस्थांशी गेली अनेक वर्षे मी संलग्नित आहे. समाजाला प्रभावीपणे व सातत्याने सेवा देण्याचे कार्य करणारे हे शिक्षण, विविध स्तरांवर दिले जाते. हे शिक्षण घेणारे महाराष्ट्रातील बहुसंख्य विद्यार्थी मराठी भाषिक असतात. त्याना या अभ्यासक्रमास । उपयुक्त असणारी पुस्तके मात्र मराठी माध्यमातून उपलब्ध नसतात. मराठी भाषिक विद्यार्थ्यांची ही अडचण डॉ. प्राजक्ता टांकसाळे यांनी ‘व्यावसायिक समाजकार्य : संकल्पना व सैद्धांतिक ज्ञान’ या पुस्तकाच्या रूपाने दूर केली आहे. समाजकार्य या विषयाचे दर्जेदार ज्ञान संपादन करण्याची मोठी सोय या पुस्तकाद्वारे झाली आहे.
समाजकार्याचे शास्त्रीय ज्ञान अतिव्यापक, अतिविस्तृत व बहुआयामी स्वरूपाचे आहे. असे हे ज्ञान संकलितरीत्या विद्यार्थ्यांसमोर या पुस्तकाद्वारे प्रथमच येत आहे हे विशेष! अभ्यास, परीक्षा याचबरोबर प्रत्यक्ष सेवाकार्य करण्यात व विद्यार्थ्यातून योग्य समाज कार्यकर्ता घडविण्यात या ज्ञानाचा उपयोग होईल हे निश्चित. एक अत्यंत गहन व चिंतनीय विषय तोही मराठीत वाचकांसमोर उलगडण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल लेखिका अभिनंदनास पात्र आहे. गेली जवळपास २० वर्षे या क्षेत्रात ज्ञान संपादनाचे, प्रत्यक्ष समाजकार्य करण्याचे व त्यातून ते ज्ञान या पुस्तकाद्वारे इतरांना उपलब्ध करून देण्याचे लेखिकेचे कार्य स्पृहणीय आहे.
डॉ. प्राजक्ता टांकसाळे यांना मी त्यांच्या विद्यार्थि- दशेपासून ओळखतो. एक व्यावसायिक समाजकार्यकर्ता व समाजकार्य शिक्षक म्हणून त्यांचा होत गेलेला विकास भी पाहिला आहे. त्यांनी मराठी भाषिक विद्यार्थ्याची एक अडचण जशी दर केली तशीच या क्षेत्रातील अन्य ज्ञान भांडाराची विद्यार्थ्यांना दुसऱ्या पुस्तकाच्या रूपाने सोय करून द्यावी ही सदिच्छा.
तारीख: २५-२-२००० पु. ल. भांडारकर
भाजी प्राध्यापक स्नातकोत्तर समाजशास्त्र विभाग व
माजी कुलगुरु नागपूर विद्यापीठ, नागपूर.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Reviews
There are no reviews yet.