लेखक : डॉ. प्रदीप नागोराव आगलावे
डॉ. प्रदीप आगलावे हे समाजशास्त्राचे सुप्रसिद्ध लेखक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. ते एक चिंतनशील लेखक, विचारवंत, अभ्यासक आणि वक्ते आहेत. समाजशास्त्र आणि आंबेडकर विचारांचे ते गाढे अभ्यासक आहेत. त्यांनी समजाशास्त्र या विषयाच्या संदर्भात अनेक पुस्तके लिहिली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या सर्वच पुस्तकांना प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या ‘समाजशास्त्रज्ञ डॉ. आंबेडकर’ आणि इतर काही ग्रंथांचा हिंदी अनुवाद दिल्लीवरून प्रकाशित झाला आहे. त्यांनी लोकमतमधून अनेक वर्ष विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे. सध्या ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा पदव्युत्तर विभागाचे प्रमुख आणि डॉ. आंबेडकर अध्यासनाचे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. प्रदीप आगलावे यांनी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय विविध परिषदा आणि कार्यशाळांमधून आपले संशोधनपर पेपर सादर केले आहेत. त्यांनी विविध परिषदांमधून अनेक व्याख्याने दिली आहेत. डॉ. आगलावे यांना समाजशास्त्र मराठी परिषदेचा उत्कृष्ट ग्रंथ लेखन पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा वैचारिक ग्रंथ पुरस्कार, मराठी साहित्य परिषद पुणे यांचा संशोधन ग्रंथ पुरस्कार, औरंगाबाद महानगरपालिकेच्या डॉ. आंबेडकर संशोधन केंद्राचा लेखनव्रती पुरस्कार इत्यादी विविध पुरस्कार मिळाले आहेत.
डॉ. प्रदीप आगलावे यांनी एमपीएससी आणि युपीएससीच्या अनेक विद्यार्थ्यांना समाजशास्त्राविषयी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पीएच.डी.चे संशोधन कार्य केले आहे. पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल सायन्सेस सोशल फोरमच्या
वतीने पाकिस्तान येथे आयोजित डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय संमेलनात १४ एप्रिल २००७ला त्यांचे बीजभाषण झाले आणि अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात २० जुलै २०१३ला त्यांचे भाषण झाले.
Reviews
There are no reviews yet.