Bee TCS Pattern Prashnapatrika Vargikaran va Vishleshan Ataparyant Zaleleya TCS chya Prashnapatrika
लेखक : अजय गुंड
मनोगत नमस्कार, विद्यार्थी मित्रांनो…
TCS पॅटर्न, प्रश्नपत्रिका (वर्गीकरण व विश्लेषण) हे पुस्तक आपल्या सेवेत सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करत असताना, अनेक विद्यार्थ्याना TCS व IBPS या कंपन्यांच्या पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांबद्दल खूप Confusion असल्याचे दिसले. प्रत्यक्षात परीक्षेमध्ये येणारे प्रश्न व विद्यार्थी जो अभ्यास करतात त्यामध्ये खूप तफावत असल्याचे जाणवते.
कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असताना, त्या परीक्षेचा पॅटर्न तसेच मागील प्रश्नपत्रिकांचाही अभ्यास असायला हवा. त्यावरून प्रश्नांचा आवाका कसा असेल हे समजू शकते व मुलांना अभ्यास करत असताना Confusion होणार नाही. याची आम्ही मार्गदर्शक म्हणून दखल घेत आहेत. त्यामुळे TCS द्वारे गेल्या वर्षभरात घेतल्या गेलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण असलेले एखादे विस्तृत पुस्तक असायला हवे, असे वाटले म्हणूनच, हे पुस्तक तुमच्या सेवेत सादर करत आहे. याचा तुम्हाला पुढे TCS व IBPS द्वारे घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी नक्कीच फायदा होईल याची आम्हांला खात्री आहे.
या पुस्तकाची निर्मितीमध्ये माझा मित्र परवेझ नदाफ व BeePublication च्या संपुर्ण टीमचे मी मनःपूर्वक आभारी आहे.
आपलाच अजय गुंड (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक)
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Reviews
There are no reviews yet.