Nitishastra Sachoti Ani Abhiyogyata नीतिशास्त्र, सचोटी व अभियोग्यता

Original price was: ₹450.00.Current price is: ₹315.00.

Author        : Subhramanya Bhalchandra Kelkar

Editor          : Mahesh Rajaram Shinde

Edition        : 2022

Language ‏  :  Marathi

Publisher   ‎ : Dnyanadeep Academy

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Nitishastra Sachoti Ani Abhiyogyata नीतिशास्त्र, सचोटी व अभियोग्यता

लेखक :  श्री. गजानन खताळ

मार्गदर्शक : श्री. महेश राजाराम शिंदे

लेखकाचे मनोगत

मराठी माध्यमातील दर्जेदार पुस्तकांची कमी अवघ्या महाराष्ट्रभर प्रकर्षाने जाणवत होती. नीतिमत्ता (इथिक्स) माझा आवडता विषय समस्या मात्र तीच. लढाई तर लढायची परंतु शस्त्रांची कमी. विषयाची आवड काही स्वस्थ बसू देईना.

फेब्रुवारी 2021 मध्ये मी काढलेल्या इथिक्सच्या सर्व नोट्सला पुस्तकाचे स्वरूप द्यायचे ठरवले. परंतु केवळ काढायचे म्हणून काढायचे नाही, नीतिमत्तेच्या विषयात तकलादूपणा नको. एकच ग्रंथ आणि तोही उत्कृष्ट काढण्याचा प्रयत्न करायचा हा निर्धार उराशी बाळगला. आणि मग काय… इथिक्स या विषयासाठी सर्वोत्कृष्ट असणाऱ्या भारतातील सर्व संस्थांचे सर्व साहित्य गोळा केले. परंतु काही गोष्टी एकात तर काही दुसऱ्यात. मग मूळ संदर्भग्रंथांना स्पर्श केला.

टेक्सास आणि केंब्रिज सारख्या युनिव्हर्सिटी, रिसर्च पेपर, परदेशी लेखकांचे ग्रंथ, विविध रिपोर्ट्स आणि जोडीला भारतातील सर्वोत्कृष्ट संस्थांचे साहित्य. आकडा 42 संदर्भ साहित्यावर येऊन ठेपला. दुविधा इथेच संपली नाही. मराठी माध्यमातील मुलांना समजावे म्हणून एकीकडे भाषाही सोपी ठेवायची आणि दुसरीकडे लिखाणात गुणवत्ताही हवी. 150 ते 250 शब्दात मुलांना उत्तर लिहायचे, किरकोळ भाषा मार्क्स मिळवून देणार नाही आणि अवघड मुलांना समजणार नाही.

मराठी मायभूमीत वाढलेल्या हजारो विद्यार्थ्यांना पूर्णतः मराठी भाषा किंवा पूर्णतः इंग्रजी भाषा अडचण निर्माण करेल याची जाणीव. भगवान बौद्धांचा मध्यममार्ग आणि ऑरस्टॉटलचा सुवर्णमध्य साधायचा असं ठरवलं. चांगले मार्क्स मिळतील अशी भाषा, सोबत इंग्रजी परंतु तांत्रिकता नको याकडे विशेष कटाक्ष. संघर्ष इथेच संपला नाही. दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवेचा अभ्यासक्रम केंद्रीय लोकसेवा आयोगासारखा केला यामुळे ग्रामीण भागातील आणि इंग्रजी माध्यम नसलेल्या माझ्यासारख्या हजारो मराठी विद्यार्थ्यांचे केवळ दर्जेदार साहित्य उपलब्ध नाही या कारणाने, राज्यसेवेतून अधिकारी होण्याचे स्वप्न भंग होऊ नये म्हणून मी हे पुस्तक प्रकाशीत करत आहे.

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 954556786 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.