Police Bharti Marathi Vyakaran
लेखक : सचिन दिलीप कुरुंद
प्रस्तावना
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज वाढत्या स्पर्धेच्या युगात Hard Work सोबत Smart Work करणे अत्यंत गरजेचे आहे. स्पर्धा तर नेहमी वाढतच आहे व परीक्षा देणारे विद्यार्थी देखील दिवसेंदिवस वाढत आहेत परंतु नियोजनबद्ध अभ्यासाची सांगड घातली तर आपले वर्दीचे स्वप्न पूर्ण करणे इतके पण अवघड नाही, त्यासाठी दर्जेदार पुस्तके वाचणे, योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेणे, चुका टाळणे, भरपूर सराव करणे आवश्यक असते. स्पर्धा परीक्षेत कोणतीही परीक्षा देणार । असाल तर त्या पदासाठी मागील पेपर अभ्यासणे खूप गरजेचे असते कारण पुढे होणाऱ्या परीक्षेत मागील प्रश्नावर आधारित प्रश्न विचारण्याचे प्रमाण खूप जास्त आहे तसेच बऱ्याच वेळा प्रश्न रिपीट होतात गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न त्या त्या टाईप वर विचारले जातात फक्त आकडे बदललेले असतात. मराठी व्याकरण या विषयावर सुद्धा खूप सारे प्रश्न रिपीट होत असतात. पोलीस भरतीत 25-25 चा पॅटर्न (चालक 20-20 ) असला तरी प्रत्येक ठिकाणी हा नियम पाळला जाईल याची शावती नसते त्यामुळे मागील प्रश्नपत्रिकांच्या अभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आम्ही हाच मुद्दा विचारात घेऊन पोलीस भरती मराठी व्याकरण या पुस्तकाची रचना केलेली आहे. या पुस्तकात प्रत्येक टॉपिक अतिशय बारकाईने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत आवश्यक ठिकाणी ट्रिक्ससह दिलेला आहे. तसेच तो टॉपिक संपल्यानंतर शेवटी पोलीस भरतीच्या 2011 पासून 2019 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न (रिपीट प्रश्न वगळलेले आहेत)) सोडवण्यास दिलेले आहेत. या सर्व प्रश्नांचा बारकाईने सराव करा. मराठी व्याकरणासोबतच शब्दसंग्रह व साहित्यविषयक सर्व माहिती कोणताही फापट पसारा न देता परिक्षाभिमुख पद्धतीने दिलेली आहे. त्या पुस्तकाचा तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. या पुस्तकाचा अभ्यास करताना लक्षपूर्वक एक एक प्रश्न वाचणे, या प्रश्नाशी संबंधित कोणता प्रश्न येऊ शकतो याचा सतत विचार करणे गरजेचे आहे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला अवघड वाटणाऱ्या प्रश्नाला लाल पेनने स्टार करून ठेवा हे स्टार केलेले प्रश्न अधून मधून सारखे वाचत राहा. इतरांच्या पुस्तकात स्टार केलेले प्रश्न अजिबात वाचू नका कारण त्या विद्यार्थ्यांने त्याला जे प्रश्न अवघड वाटतात त्याला स्टार केलेले असेल तो प्रश्न तुमच्यासाठी सोपा असू शकतो त्याला सोपा वाटलेला प्रश्न तुम्हाला अवघड वाटू शकतो. प्रश्न अभ्यासताना प्रमाणापेक्षा जास्त प्रश्न स्टार होऊ नये याची काळजी घ्या नाहीतर स्टार झालेले प्रश्न जास्त होतील.
प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करताना खास विद्यार्थी मित्रांसाठी ज्ञानांकुर अकॅडमी पुणे या अँपच्या माध्यमातून (Dnyanankur Academy Pune) जास्तीत जास्त सराव प्रश्न/ टेस्ट सोडवा. कारण सरावानेच माणूस परिपूर्ण होतो तसेच या पुस्तकात प्रश्नपत्रिकेचा सराव करताना तुमच्याकडून ज्या प्रकारच्या चुका होतील त्या चुका एका ठिकाणी लिहून ठेवा सराव करत असताना कितीही चुका करा परंतु एका प्रकारची चूक पुन्हा होता कामा नये यासाठीच या चुका लिहून ठेवा म्हणून सांगत आहे. पुढचा टॉपिक वाचण्याच्या अगोदर मागील टॉपिकमध्ये आपण कोणत्या चूका केल्या त्या चुका वाचा म्हणजे त्या चुका होण्याचे कारण काय हे वाचा व नंतर पुढचे प्रश्न सोडवण्यास वाचण्यास सुरुवात करा परत नव्याने ज्या चुका होतील त्या लिहून ठेवा असे संपूर्ण पुस्तक वाचून सोडवून पूर्ण करा जो प्रश्न चुकला त्याच्याबद्दल माहिती लगेच पुस्तकात वाचायला विसरू नका म्हणजे तो प्रश्न परत चुकणार नाही असे केल्यास काही दिवसानंतर तुमच्या स्कोर मध्ये अमुलाग्र बदल झालेला नक्की दिसेल. दररोज अभ्यास करताना वाचण्यासोबतच प्रश्न सोडवणे अत्यंत गरजेचे आहे यामुळे प्रश्न कसा येतो? कोणता उपघटक महत्त्वाचा आहे? आपण जे दिवसभर वाचतो त्यातील प्रश्न परीक्षेत येतात का? का आपण दिशाहीन अभ्यास करतो? यासाठीच प्रश्न सोडवणे अत्यंत आवश्यक आहे
कोणत्याही कामामागे जरी एकाचे नाव असले तरी त्यामागे बऱ्याच व्यक्तींचे सहकार्य महत्वपूर्ण असते या पुस्तकाच्या लिखाणापासून ते प्रकाशनापर्यंत माझ्या कुटुंबाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या मित्र परिवाराचा हातभार अनमोल ठरतो या सर्वांचा मी ऋणी आहे शेवटी सर्व परीक्षार्थी मित्रांना तुमचे खाकीचे स्वप्न पूर्ण होवो यासाठीच खूप खूप शुभेच्छा!
• सचिन दिलीप कुरुंद –
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Reviews
There are no reviews yet.